Ahilyanagar News : राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी शासन दरबारी अनेक शिक्षणासंदर्भात योजना आणि उपक्रम राबवले जातात. मात्र शाळा असूनही तिथवर पोहचण्याचा खडतर मार्ग अद्याप सुटलेले नाही, याची अनेक उदाहरण आपण बघत अथवा वाचत असतो. असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या गावातून समोर आला आहे. परिणामी सततच्या त्रासाला कंटाळून गावातील विद्यार्थांनी आता चक्क महिला सरपंचाच्या चारचाकी गाडीवर चिखल फेकत जाब विचारला आहे. मात्र त्यामागील कारण म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबि आलेली रस्त्याची मागणी.

Continues below advertisement


रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार, महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक


मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळगाव ते ढोर हिंगणी छोटा या गावापर्यंत अनेक वर्षांनंतरही रस्ता झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हल्ली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे हि वाट अधिक बिकट झाली असून विद्यार्थांना चिखलात वाट तुडवत जावं लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट रस्त्यावरून जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीला चिखल फेकून मारला आहे. सविता शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखल फेकल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे विद्यार्थांचा रोष बघता आता तरी या रस्त्याची मागणी पूर्ण होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.



खड्डा चुकविताना भविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर


भंडाऱ्याच्या चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणारं भाविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर जखमी झाल्यात. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा आरव्ही (५०) यांना तातडीनं नागपूरला हलविण्यात आलं असून उर्वरित चार जखमींवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यान घडली.


झोपेत सर्पदंशाने मुलीचा मृत्यू, कर्णपुरा भागातील घटना 


छत्रपती संभाजी नगरात झोपेत अंथरुणात विषारी साप चावून एका 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कर्णपुरा भागात हा प्रकार घडला. वैष्णवी अखिलेश पवार असे मृत मुलीचे नाव असून तिचे वडील हे बांधकाम कामगार आहेत. रात्री वैष्णवी घरात झोपलेली असताना तिला साप चावला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तुझ्या वडिलांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या