Ahilyanagar Crime : अहिल्यानगरच्या पारनेर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लघु शंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे घडली आहे. काल(16 जानेवारी) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे या मुलीचे नाव असून वडिलांसोबत ती घराच्या पडवीत होती. त्यानंतर लघु शंकेसाठी बाजूला गेली असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत तिला ओढत पिकात नेले.
त्यानंतर तिचा आवाज ऐकल्यावर वडिलांनी बचावासाठी धाव घेतली. मात्र बिबट्याच्या तावडीतून तिला सोडवण्यात कसंतरी यश आले. परंतु उपचारसाठी नेले असता त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या घटणेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पासरलं आहे. तर दुसरीकडे बिबट्याची दहशत लक्षात घेता वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या
दरम्यान, आष्टी तालुक्यातील वाहिरा गावातून अशीच एक हत्येची बातमी समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आपसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे.
तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती
पुढे आलेल्या माहितीनुसार, या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत, तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.
हे ही वाचा