पेब किल्ल्यावर दोन ट्रेकर्स दरीत कोसळले, दोघांनाही वाचवण्यात यश
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2017 04:44 PM (IST)
रायगड : पावसाळ्यात तुम्हीही ट्रेकिंगसाठी जात असाल तर सांभाळून जा. कारण रायगड जिल्ह्यातील नेरळ नजीकच्या पेब किल्ल्यावरुन दोन ट्रेकर्स दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने दोन्ही ट्रेकर्स सुरक्षित आहेत. किल्ल्यावरील गणपती मंदिर नजीकच्या दरीत तरुण आणि तरुणी कोसळले होते. यात तरुणीच्या पायाला दुखापत झाली आहे. तर तरुण सरुक्षित आहे. नेरळ पोलीस आणि खोपोलीतील ट्रेकर्सच्या मदतीने दोघांना वाचवण्यात आलं. पावसाळ्यामुळे सध्या अनेक जण वीकेंडला ट्रेकिंगसाठी जात आहेत. पर्यटनस्थळी मोठी गर्दी आहे. मात्र अशा दुर्घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगण्याची गरज आहे.