Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार | ABP Majha



    1. महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता, आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत निर्णायक बैठक

    2. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या चर्चेत नवा फॉर्म्युला, शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदं, रात्री उशिरापर्यंत खलबतं

    3. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह, सूत्रांची माहिती, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात आणि दोन्ही चव्हाणांमध्ये चुरस

    4. शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी, भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मातोश्रीवर प्रस्ताव, दैनिक लोकसत्ताचं वृत्त, पण संजय राऊत यांच्याकडून खंडन

    5. कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या तोंडी सॉफ्ट सेक्युलॅरिझम, हिंदुत्ववादाच्या प्रश्नावर संजय राऊतांकडून धर्मनिरपेक्ष संविधानाची आठवण






  1. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील महापालिकांमध्ये महापौरपदाची निवडणूक, महाविकासआघाडी इम्पॅक्टकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

  2. नव्या घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, डिसेंबरअखेर म्हाडाच्या साडे सहा हजार घरांसाठी लॉटरी, कोकण, ठाणे, भिवंडी, वसईमध्ये घरं

  3. मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, मुंबईत गेल्या पाच वर्षांत महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

  4. एक डिसेंबरपासून मोबाईल इंटरनेट महागणार, जिओ, व्होडाफोन, आयडियासह प्रमुख कंपन्यांकडून मोबाईल डेटाच्या दरात वाढ, ग्राहकांना भुर्दंड

  5. ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाड़िलकर यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, अग्रलेखांचा बादशहा काळच्या पडद्याआड