- सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा नाही, सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची माहिती तर आघाडीच्या मित्रपक्षांना नाराज करणार नसल्याचं वक्तव्य
- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये एकसूत्रीवर चर्चाच नाही, संभाव्य महाशिवआघाडीला धक्का देणारं शरद पवारांचं वक्तव्य, आज दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची पुन्हा खलबतं
- विरोधी बाकावर बसताना शिवसेनेकडून शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल, तर कधीच वेलमध्ये न उतरणाऱ्या राष्ट्रवादीचं नरेंद्र मोदींकडून कौतुक, चर्चांना उधाण
- मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची वर्णी निश्चित, नागपुरात महापौरपद वाटून देण्याचा भाजपचा निर्णय, तर कोल्हापुरात महाशिवआघाडी
- मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एसईबीसी कायद्याबाबात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी
- मुंबईतल्या मॉलमधील पार्किंग सर्वांसाठी खुली, मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय, रस्त्यावरील पार्किंग टाळण्यासाठी पाऊल
- हिरव्या, केशरीनंतर डोंबिवलीत आता जांभळं पाणी, भंगारवाले गोण्या धूत असल्याने नाला प्रदूषित झाल्याचा अधिकाऱ्यांचा जावईशोध, डोंबिवलीकरांचा संताप
- दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 3 मार्च तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून, सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर
- सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातले चार जवान शहीद, तर दोन जवान अत्यवस्थ, दोन सिव्हिलीयन पोर्टरचाही मृत्यू
- तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने बंदी घालण्याची एका आईची मागणी