नागपूरः काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये राशन दुकाने नव्हती. यामुळे नागरीकांना दुसऱ्या गावांत जावुन धान्य घ्यावे लागत होते. ही अचडण लक्षात घेता नविन दुकाने मंजुर करण्यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. याचा पाठपुरावा करुन काटोल व नरखेड तालुक्यात एकुण 54 नविन राशन दुकाने मंजुर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सलील देशमुख यांनी दिली.


गावात राशन दुकान नसल्याने अनेक नागरीकांना दुसऱ्या गावात जावुन रेशन घेण्यासाठी जावे लागत होते. यात त्यांचा बराच वेळ वाया जात तर होताच परत त्रास सुध्दा होत होता. यामुळे नागरीकांनी आमच्याच गावात राशन दुकान मंजुर करण्यासाठी मोठया प्रमाणात मागणी होत होती. कोणत्या गावात राशन दुकाने नाहीत याचा संपुर्ण माहिती तयार करुन तसा प्रस्ताव हा शासन दरबारी अनिल देशमुख यांनी सादर केला होता. नागरीकांची अडचण लक्षात घेता सलील देशमुख यांनी सुध्दा मंत्रालय स्तरावर यांचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने त्यांनी बैठकी घेतल्या होत्या. त्यांनतर काटोल व नरखेडसाठी 54 राशन दुकाने मंजुर करण्यात आली. आता याचे जाहीरनामे निघाले असून 29 जुलै पर्यत यासाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगीतले.


काटोल तालुक्यात पठार, वडविहीरा, वाघोडा, चिचाळा, पंचमवाडी, पांढरढाकणी, कोल्हु, चौरेपठार, सावळी बु., कारला, गोल्हारखापा, मुकनी, ताराबोडी, लाखोळी, वाजबोडी,कलमुंडा,शेकापुर, खापा, तरोडा,बिलावरगोंदी, धामणगाव, मुरली, वसंतनगर, मलकापुर, भाजीपाणी, बोरडोह, हरणखुरी, बोरगोंदी, अहमदनगर, गणेशपुर, कुंडी, कुकडीपांजरा, हरदोली, गोडीमोहगाव, कोंढाळी, गुजरखेडी या गावांचा तर नरखेड तालुक्यातील खारगड, लोहारा, गुमगाव, पिठोरी, बानोर, जुनोना फुके, मालापुर, बानोरचंद्र, दिंदरगाव, जुनोना घारड, नारसिंगी, जोलवाडी, खेडी खू., नांदा शिंदे, वडविहीरा, गोंडेगाव, देवळी या गावांचा समावेश आहे. या संदर्भात सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विहीत अर्ज सादर करावे व अधिक माहीतीसाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी काटोल उपविभाग कमलेश कुंभरे यांच्यासोबत संर्पक करावा अशी माहितीही सलील देशमुख यांनी दिली.


महिला बचत गटांना प्राध्यान


अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असतांना अनिल देशमुख यांना एैतीहासीक निर्णय घेत राज्यातील सर्व नविन राशन दुकाने हे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयानुसार काटोल व नरखेड तालुक्यातील मंजुर ही 54 राशन दुकाने देण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यानंतर स्थनीक स्वराज्य संस्था किंवा सरकारी संस्था यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.