नागपूरः कोरोनाच्या दोन वर्षाच्या विश्रांतीनंगर यंदा आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळेच श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहे. नागपूर विभागातून 50 बस जाणार असून नागपूर प्रदेशातून 100 गाड्या सोडण्यात येणार आहे.
एसटीच्या 6 ते 14 जुलै दरम्यान विशेष गाड्या धावणार आहे. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलैला बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणांसह नागपूर येथून सुद्धा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागातून यात्रेकरिता जाणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या वाढत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. दोन वर्षानंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा पायी वारी निघाल्याने एसटीने पंढरपूरला जाणारे वाढणार आहे. गेल्यावर्षी शिवशाही बसने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपुरला नेण्यात आल्या होत्या. दोन वर्षापर्यंत भाविकांना वारीत जाता आले नाही. त्यामुळे हिरमोड झाला होता. यंदा वारीवर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ग्रुप बुकिंगची सुविधा
यावर्षी आषाढी एकादशी 10 जुलैला असल्याने 6 जुलैपासूनच गणेशपेठ आगारातून बसेस सोडण्यात येणार आहे. भाविकांना ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. ग्रुप बुकिंगमुळे एकत्रित प्रवासाची संधी आहे. बुकिंग केल्यास भाविकांना त्यांच्या गावावरुन पंढरपूरला जाता येणार आहे. त्यासाठी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता
International Yoga Day 2022 : शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
NMC Elections 2022 : मतदार याद्यांमध्ये गोंधळ ; मनपा निवडणूक लांबणार?