नागपूरः रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (RCNV)च्या 2022-23 साठी नव्या कार्यकारणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. यावेळी 42 सदस्यांनी अवयवदानाची शपथ घेतली. यावर्षासाठी डॉ. शिवाणी सुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ महेश कोटबागी यांची उपस्थिती होती.
यावेळी रोटरीचे असिसटंट गव्हर्नर चोटवानी यांच्यासह विविध भागीदार संस्थांचे प्रतिनिधी, इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव आणि जिल्हा पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. महेश कोटबागी यांनी RCNV सोबतच्या त्यांच्या आठवणींवर उजाळा टाकला. तसेच क्लबतर्फे करण्यात आलेल्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कोविड-19 नंतर विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी रोटरी इंडिया कसे काम करत आहे याबद्दलही त्यांनी सादरीकरण केले.
Bus Bai Bus : सुप्रसिद्ध महिलांशी साधणार खास संवाद, ‘बस बाई बस’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!
आयपीपी विक्रम नायडू यांनी 2021-2022 वर्षांतील कार्यअहवाल सादर केला. तसेच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष डॉ. शिवानी सुळे यांनी 25 नवीन सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट केले. सचिव रितिका सिंघवी, कोषाध्यक्ष आर.टी. रितेश अमिडवार, आणि अध्यक्ष आर.टी. अजय उपलांचीवार, उपाध्यक्ष आर.टी. पिनाकी मुखर्जी, सहसचिव डॉ. अक्षय डागा, अनघा जैस्वाल, अभिषेक घाटोडे, डॉ. रुपश्री भोयर, संदीप दुरुगकर, नितीन सचदेवा, धवल जैन, मोहित चौधरी, डॉ रश्मी शाहू, माजी अध्यक्ष आर.टी. विक्रम नायडू यांची उपस्थिती होती. अध्यक्ष डॉ. शिवानी सुळे यांनी रोटरी वर्ष 2022-23 ची थीम इमॅजिन, इन्व्हॉल्व्ह आणि इव्हॉल्व्ह असल्याची माहिती देत त्यांच्या व्हिजनबद्दल उपस्थितांना सांगितले. उपस्थितांचे आभार रितिका सिंगवी यांनी मानले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले.