महिलेला 6.5 लाखाला गंडा, मुंबईतील 24 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या!
एबीपी माझा वेब टीम | 11 Jun 2016 11:50 AM (IST)
मुंबई: मुंबईत भोंदू बाबाच्या अवतारात जाऊन फसवणूक करणाऱ्या चोवीस वर्षीय सागर जोशी या भोंदू बाबाला चारकोप पोलीसांनी अटक केली आहे. हा भोंदू बाबा महिला एकट्या असताना गणपतीची पूजा करण्याच्या बहाण्याने घरात घुसायचा त्यानंतर काळ्या जादूची भीती दाखवून त्यांच्या कडून लाखोंचे दागिने आणि रोकड उकळायचा. एका महिलेच्या घरात जाऊन अशाच प्रकारे फसवणूक करून लाखो रुपयांचे दागिने त्याने उकळले. तरीही तिच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिला याबाबत संशय आल्याने तिने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या भोंदूबाबाला आजवर तब्बल 6.5 लाख दिले असल्याचा महिलेचा आरोप आहे. मात्र, काही दिवसांनी या भोंदूबाबानं त्या महिलेचा फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर तिने याबाबत पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदूबाबाला तात्काळ अटक केली.