भुजबळांच्या समर्थनार्थ नाशकात ओबीसी समाजाचा एल्गार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोर्चासाठी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छगन भुजबळांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला. याशिवाय मुंडेंना संपवलं, आता भुजबळांना संपवू देणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
विजय माल्या 9 हजार कोटींचा घोटाळा करुन गेला, त्याला सरकार काहीही करु शकलं नाही. मात्र भुजबळांवर 870 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना जामीन न देता, केवळ सूडाचं राजकारण म्हणून अडकवून ठेवल्याची प्रतिक्रिया समर्थकांनी दिली.
या मोर्चात राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेही या मोर्चात सहभागी झाले आहेत.
या मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून अनेक भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. छगन भुजबळांना जेलमधून सोडा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -