युवक तब्बल दोन तास झाडाखाली अडकून, स्थानिक सेल्फीत दंग
नाशिकमधील वकीलवाडीत मुख्य रस्त्यावर भलं मोठं झाड एका मोटारसायकलस्वारावर पडल्याची घटना घडली आहे.
पोलिसांना शेवटी खाकीचा वापर करुन जमावाला हटवावं लागलं.
अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर युवकाला सुखरुप वाचवण्यात आलं. मात्र काही स्थानिकांनी मदत केली तर काही जण झाडाखाली अडकलेल्या तरुणासोबत सेल्फी काढण्यात दंग होते.
वकीलवाडी हा नाशिकमधील अतिशय वर्दळीचा परिसर आहे. या रस्त्यावर जुनी झाडंही मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाने झाडं कमकुवत झाल्याने अशा दुर्घटना घडत आहेत.
या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. दुचाकीस्वाराचा पाय तब्बल दोन तास झाडाखाली अडकून होता.
स्थानिकांनी अडकलेल्या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण झाड मोठं असल्यानं अपयश येत होतं. यावेळी नाशिककरांच्या सेल्फीने बचावकार्यात मोठा अडथला आणला.
तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला झाडाखाली अडकलेल्या युवकाला वाचवण्यात यश आलं आहे.