राहुल महाजनची घटस्फोटीत पत्नी डिम्पी गांगुली प्रेग्नंट
यानंतर डिम्पीने बिग बॉसच्या आठव्या पर्वात भाग घेतला. या शोमध्ये राहुल महाजनला पाहुणा कलाकार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी दोघांनीही ही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हाताळली होती. यानंतर जेव्हा डिम्पीने साखरपुड्याची घोषणा केली, तेव्हा राहुलने डिम्पीचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
फोटो शेअर करताना तिने भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
राहुल महाजनकडून घटस्फोट मिळाल्यानंतर डिम्पीने गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला दुबईतील उद्योगपती रोहित रॉयसोबत पुन्हा लग्न केले होते.
राहुल महाजनची घटस्फोटीत पत्नी डिम्पी गांगुली प्रेग्नंट आहे. तिने आपला पती रोहित रॉयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
डिम्पी 2010 साली राहुल दुल्हनिया ले जाएगा या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. ही स्पर्धा जिंकत तीचं आणि राहुल महाजन यांचं लग्न झालं. पण त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात वाद होऊन, ते वेगळे झाले.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आपल्या पतीच्या गालाचे चुंबन घेताना दिसते आहे. तसेच या फोटोत तीचा बेबीबम्प पाहायला मिळत आहे.