मुंबई आणि पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान काय काय करणार?
रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे रवाना होतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करतील.
संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होतील.
संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी मुंबई एअरपोर्टवरुन पुण्याच्या दिशेने रवाना होतील.
संध्याकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधान मोदी बीकेसीमधून रवाना होतील.
त्यानंतर दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पंतप्रधान मोदी गिरगाव चौपाटीहून हॉवरक्राफ्टने राजभवनात पोहोचतील.
दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्या सोबत असतील.
त्यानंतर स्नेहभोजनासाठी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी राजभवनात दाखल होतील.
दुपारी 12 वाजता पनवेलमधील पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन पंतप्रधान करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. त्यानंतर ते पनवेलकडे रवाना होतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -