अस्थिविकार रुग्णांचा क्रिकेट सामना
रुग्णांची सोय आणि सुरक्षितता ध्यानात घेऊन सामन्याच्या ठिकाणी रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका, अस्थीविकार तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट उपलब्ध होते, ज्यामुळे रुग्णांनी क्रिकेटचा बिनधास्त आनंद लुटला.
क्रिकेट हे निव्वळ सुदृढतेचे एक परिमाण आहे. कोहिनूर हॉस्पिटलमधून सर्जरी झालेले हे सुपरहिरोज क्रिकेट खेळू शकतात तर त्यांच्यासारखे इतर अनेक अस्थिविकाराचे रुग्ण शस्त्रक्रियांनंतर नक्कीच नॉर्मल आयुष्य जगू शकतात. हा समस्त रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा सामना घेतला.
एकदा ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया झाली की पूर्वीप्रमाणे हालचाल करता येत नाही असा सर्वसाधारण समज आहे. हा समज पुसून टाकून, अशा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच हसत-खेळत आयुष्य जगणे शक्य आहे हा संदेश देण्याच्या हेतूने कोहिनूर हॉस्पिटलने हा उपक्रम हाती घेतला.
ऑक्टोबर हा अस्थिविकार जागृती महिना आहे. मुंबईतील कोहिनूर रुग्णालयातर्फे 27 ऑक्टोबरला खास अस्थिविकाराच्या रुग्णांसाठी आगळावेगळा बॉक्स क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता
कोहिनूर हॉस्पिटलशेजारील कोहिनूर बिझनेस स्कूलच्या मैदानात हा सामना रंगला. यामध्ये शस्त्रक्रियांमधून गेलेले हे 'कोहिनूरचे सुपरहिरोज', डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
केवळ 5-5 षटकांच्या या सामन्यात प्रत्येक संघात 8 रुग्ण, एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश होता.
ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया झालेल्या अनेक रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या आणि इतरांच्या ढासळलेल्या आत्मविश्वासाचीच विकेट काढली.