शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी अपघातग्रस्त स्पीडबोट
एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार होती
नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवल्याचा आरोपही पाटलांनी केला.
अपघातावेळी स्पीड बोटमध्ये असलेल्या व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.
अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला.
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली.
बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप आहेत, तर सिद्धेश पवार हा कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे.