समुद्राला उधाण, लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2016 04:07 PM (IST)
1
मुंबई आणि कोकणात पावसाचं सत्र आजही कायम आहे. पावसाबरोबर समुद्र किनाऱ्यालाही उधाण आलं आहे.
2
आज सकाळपासूनच गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
3
रविवार असल्यामुळे या लाटा डोळ्यात टिपण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिनारी सकाळपासूनच गर्दी केली आहे.
4
या महाकाय लाटांसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुंबईकर आवरू शकले नाहीत. मात्र सेल्फी घेताना काळजी घेण्याची गरज आहे.
5
आज सकाळी 11.18 मिनिटांनी अंदाजे चार मीटर उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या.
6
हाय टाईडवेळी मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.