रन मुंबई रन! 14 व्या मुंबई मॅरेथॉनची क्षणचित्रं
सीएसटीपासून सुरु झालेली दिव्यांगांची मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली. या मॅरेथॉनसाठी 2.4 किलोमीटर इतकं अंतर ठेवण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्यांगांचाही नेहमीप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेत मोठा सहभाग आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली.
हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये जी लक्ष्मण यांनी बाजी मारली, तर सचिन पाटील यांनी दुसऱ्या क्रमांक पटकावला. दीपक कुंभार हे तिसरे आले.
हाफ मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंच्या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला.
बोचऱ्या थंडीत आज मुंबईनगरी 14 व्या मॅरेथॉनसाठी एकत्रितपणे धावत आहे. मुख्य मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या शर्यती मॅरेथॉनमध्ये होत आहेत.
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महादेव जानकर, शायना एनसी उपस्थित होते. यंदाही या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -