✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकात दाखल

एबीपी माझा वेब टीम   |  06 Jul 2020 02:18 PM (IST)
1

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचीही चौकशी करण्यात येत आहे.

2

दरम्यान, संजनाने सुशांत सिंह राजपूतसोबत 'दिल बेचारा' या चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट सुशांतचा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात येणार असून 24 जुलै रोजी चित्रपट लॉन्च केला जाणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

3

पोलिसांनी संजना सांघीची जवळपास 9 तासांपर्यंत चौकशी केली होती. ती सकाळी जवळपास 11 वाजता पोलीस स्थानकात पोहोचली होती आणि संध्याकाळी 8 वाजता तिथून आपल्या घरी परतली.

4

संजय भन्साळी यांच्याआधी सुशांतची कोस्टार संजना सांघी यांच्यासह 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

5

काही सूत्रांनी पोलिसांना सूचित केलं आहे की, प्रोडक्शन हाऊससोबतचं कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांनी सुशांतला एकटं पाडण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळं सुशांतला काम मिळणं कठिण झालं. मात्र सुशांतनं आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर एम. एस. धोनीसारखा मोठा चित्रपट केला. मात्र त्यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. सुशांतनं आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम न करण्याबाबत सांगितलं होतं. यामुळं पोलिस संजय लीला भंसाली यांची चौकशी करणार आहेत.

6

संजय लीला भन्साळी यांना वांद्रे पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी आपला जबाब नोंदवण्यासाठी ते पोलीस स्थानकात दाखल झाले.

7

यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर मास्क लावून संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकाच्या परिसरात दिसून आले. दरम्यान, त्यांनी मीडियाशी बोलणं टाळलं.

8

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी आज सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांसंदर्भात करण्यात आली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बॉलिवूड
  • PHOTO | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकात दाखल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.