नाना पाटेकर, सलमान, सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा
श्रद्धा कपूरनेही आपल्या कुटुंबीयांसोबत बाप्पाची पूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराखी सावंतच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले.
राखीने ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले.
अभिनेता नील नितिन मुकेश यांनेही बाप्पाची मनोभावे पूजा केली.
गणेशोत्सवाच्या काळात अभिनेता नाना पाटेकर यांच्या बाप्पाचे अनेकांना आकर्षण असते. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करतो. नाना पाटेकरांच्या घरातील बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर असते.
अभिनेता मनीष पॉल याने आपल्या पत्नीसोबत गणरायाचे पूजन केले.
संपूर्ण देशात कालपासून गणेशोत्सवाची धूम सुरु झाली. प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडसोबतच टेलिव्हिजन जगतातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या घरांमध्येही गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणरायाच्या आगमनाचे फोटो अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदानेही आपल्या कुटुंबीयांसोबत बाप्पाची मनोभावे पूजा केली.
अभिनेता जीतेंद्र कपूर आणि मुलगा तुषार कपूर यांनी गणरायाची मनोभावे पूजा केली.
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या घरात गणेशोत्सवाची वेगळीच धूम असते. दरवर्षी सलमानच्या घरात दीड दिवसांचे बाप्पा विराजमान होतात. काल सलमानची आई सुशीला यांनी गणरायाचे स्वागत केले.
भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार एम. एस. धोनीच्या बायोपिकमध्ये माहीची भूमिका साकारणारा सुशांत राजपूत यानेही गणपती बाप्पासोबतचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -