Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पडद्यावरील गीताच्या समर्थनासाठी रिअल लाईफमधील गीता-बबिता मैदानात
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची 'दंगल' फेम जायरा वासीमने भेट घेतल्याने सोशल मीडियातून तिच्यावर टीका होत होती. यानंतर जायरानेही तत्काळ फेसबुकच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रकरणावर रिअल लाईफमधील महिला कुस्तीपटू गीत फगोट यांनी जायराचे समर्थन केलं आहे. गीता फगोट यांनी जायराचे समर्थन करताना, ''तिने धाकड (धाडसी) मुलीची भूमिका साकरली आहे. त्यामुळे तिला भिण्याचे किंवा अपमानास्पद वाटण्याची काहीच गरज नाही.'' असं म्हणलं आहे.
आता या संपूर्ण प्रकरणानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद आख्तर यांनी ट्विट करुन आपली मते मांडली आहेत. जावेद आख्तर यांनी, ''जे लोक स्वातंत्र्यासाठी उर बडवतात, ते दुसऱ्यांना थोडेही स्वातंत्र्य देत नाहीत. जायराला तिच्या यशानंतर सर्वांची माफी मागावी लागत आहे.'' असं म्हणलं आहे.
गीताची बहीण आणि महिला कुस्तीपटू बबीता फोगाटनेही जायराचे समर्थन केले आहे. बबीता म्हणते की, ''आम्हाला या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिला मी हे सांगू इच्छिते की, तिला घाबरण्याचे काहीच कारण नाही, संपूर्ण देश तिच्या पाठिशी आहे.''
जायरा पुढे म्हणते की, ''मी सध्या १६ वर्षांची आहे, त्यामुळे माझे वय लक्षात घेऊन सर्वजण माझ्याशी सामान्य व्यवहार करतील अशी मला आशा आहे. मी जे केले त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. कारण हा निर्णय मी जाणूनबुजून घेतलेला नाही. लोक मला माफ करतील अशी मला आशा आहे.''
जायराने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, ''मी नुकतीच ज्यांची भेट घेतली, त्या भेटीवरुन अनेकांना वाईट वाटले. या भेटीमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सर्वांची मी जाहीर माफी मागते. गेल्या सहा महिन्यात ज्या घटना घडल्या, त्यावरुन त्यांच्या भावना मी समजू शकते. पण, अनेकवेळा तुमच्या समोर अशी परिस्थिती उद्भवते, ज्याच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही,'' असे म्हणले होते.
विशेष म्हणजे, तिने आपल्या माफीनाम्यामध्ये काश्मीरी जनतेने तिला रोल मॉडेल समजू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. कारण इतिहासात अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे मला त्यांच्या पंगतीत नेऊन बसवणे त्यांचा अपमान ठरेल. तसेच आपल्याला नवा कोणताही वाद उपस्थित करायचे नसल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.
मेहबूबा मुफ्तींची भेट घेतल्याने तिला जीवे मारण्याची धमकीही येत होती. यामुळे तिने जाहीर माफी मागितली. पण तीनच तासात तिने आपला माफीनामा फेसबुकवरुन हटवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -