जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी, दीपिकाचा नंबर कितवा?
सिव्हील वॉर फेम स्कार्लेट जॉनसनच्या कमाईत घट झाली असली, तरीही तिने तिसऱ्या स्थानावर जागा मिळवली आहे. तिची 25 कोटी डॉलर्स कमाई आहे. एका रिपोर्टनुसार, घोस्ट इन शेलसाठी तिला 18 कोटी डॉलर मानधन मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवव्या स्थानी मीला कुनिसचा नंबर आहे, तिने चित्रपट आणि जाहिरातींद्वारे 11 कोटी डॉलर्स कमाई केली.
या यादीत दुसऱ्या स्थानी मेलसा मेकार्थीचा क्रमांक आहे. तिने जवळपास 33 कोटी डॉलर कमाई केली आहे. घोस्टबस्टर्सच्या रिमेकमध्ये तिने चांगली कमाई केली.
आठव्या स्थानी ज्यूलिस रॉबर्टस हिचा क्रमांक आहे. तिच्या मदर्स डे या चित्रपटातील भूमिकेची सर्वच चित्रपट समिक्षकांनी टीका केली. मात्र, असे असूनही तिने कमाईच्या बाबतीत टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले. तिने या वर्षी 12 कोटी डॉलर्स कमाई केली.
या यादीत 'एक्स मॅन सीरीज'मधील चित्रपटात काम केलेल्या जेनिफर लॉरेंसचा पहिला क्रमांक आहे. लॉरेंसला या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'जॉय' या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले होते, मात्र या पुरस्काराने तिला थोडक्यात हुलकावणी दिली. लॉरेंसने 46 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे.
21 कोटी डॉलर्सच्या कमाईमुळे जेनिफर एनिस्टनने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिने जाहिरातींद्वारे सर्वाधिक कमाई केल. तिचा आगामी चित्रपट 'ऑफिस क्रिसमस पार्टी'साठी तिला चांगले मानधन मिळाले.
पाचव्या क्रमांकावर चीनची फेन बिंगबिंग आहे. तिची कमाई 17 कोटी डॉलर्स आहे. L'Oreal आणि Chopard सारख्या कंपनींकडून तिला चांगले मानधन मिळाले. 2014 मधील 'एक्स मॅन' चित्रपटाच्या सीरीजमधील 'डेज ऑफ फ्यूटर अॅन्ड पास्ट'मध्येही ती दिसली होती.
या यादीत 10 व्या स्थानी भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणचा क्रमांक आहे. बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट दिल्यानंतर, सध्या ती हॉलिवूडमध्येही नशीब आजमावत आहे. ज्यामुळे तिच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. तिने प्रियंका चोप्राला मागे टाकत टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे. दीपिका अनेक जाहिरात कंपनींशी संबंधित आहे.
सहाव्या स्थानी चार्लिज थेरॉन या अभिनेत्रीचा क्रमांक आहे. तिची कमाई 16.5 कोटी डॉलर्स आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, The Hutsman: Winter's Warसाठी तिला तब्बल 10 कोटी डॉलर्स मिळाले.
सातव्या क्रमांकावर ऐमी एडम्स आहे. ऐमीने या वर्षी 13.5 कोटी डॉलर्स कमाई केली. तिला पाचवेळ ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मात्र, या पुरस्काराने तिला थोडक्यात हुलकावणी दिली. ती मॅक्समारासारख्या ऑनलाईन स्टोअरसाठी जाहिरात करते.
फोर्ब्स मॅगेझीनने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी प्रकाशित केली आहे. या यादीत दीपिका पदुकोणचा टॉप 10 च्या यादीत समावेश झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -