आता दीपिका डिप्रेशनग्रस्तांना आधार देणार!
नुकत्याच प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 5% नागरिक लहान-मोठ्या मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. 2 ते 2.5 टक्के नागरिक बायपोलरसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. एक टक्का स्किट्सफ्रीनिया, तर 15% मेंटल एंजाइटी डिसऑर्डरसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मनोरुग्ण आहेत. भारतातील ५० कोटी नागरिक असे आहेत, ज्यांना कधीना कधी डिप्रेशनचा सामना करावा लागला असल्याचा डॉ. राव यांनी दावा केला आहे.
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री दीपिका पादूकोणने बंगळुरुच्या माऊंट कारमेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र मॉडलिंगची तयारी करत असल्यामुळे शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर दीपिकाने शॉर्ट टर्म कोर्ससाठी प्रवेश घेतला, मात्र वेळेअभावी हा कोर्सही अपूर्ण राहिला.
दीपिकाच्या मते, इंडियन सायकॅट्रिक सोसायटीची ब्राण्ड अम्बॅसिडर झाल्याने आणि या नव्या भूमिकेने अतिशय आनंद झाला आहे.
गेल्या वर्षीच दीपिकाने आपल्या डिप्रेशनसंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली होती.
सध्या भारतीयांचे ढासळणारे मानसिक स्वास्थ ही देशासमोरची गंभीर समस्या ठरत आहे. या विरोधात जनजागृतीसाठी अधिकाधिक सोर्सची गरज आहे.
या सोसायटीची स्थापना 1974 रोजी झाली होती. सध्या ही संस्था दीपिकाच्या बंगळुरुमधील लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन(TLLLF) सोबत काम करते. या दोन्ही संस्था भारतातील मानसिक स्वास्थाच्या समस्यांनी ग्रस्त असल्येल्यांसाठी कार्यक्रम हाती घेणार आहे.
बॉलिवूड स्टार दीपिका पदूकोण एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे ती आता इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या सहकार्याने अशा व्यक्तींना आधार देणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -