नोटाबंदी: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरही पैशांसाठी एटीएमच्या रांगेत
''एटीएमच्या रांगेत सेल्फी घेत आहे. नोटाबंदीमुळे मला तुम्हा सर्वांच भेट घेण्याची संधी मिळाली,'' असे अनिल कपूरने या रिट्वीटमध्ये म्हणले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल कपूरने गुरुवारी दोन महिला चाहत्यांसोबतचा फोटो रिट्वीट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशभरातील एटीएम सेंटर आणि बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशभरातील जनतेसोबतच बॉलिवुडमधूनही कौतुक झाले. पण आता चलन टंचाईमुळे सर्वसामान्यांसोबतच अनेक अभिनेते एटीएमच्या रांगेत उभे असलेले पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही चलन टंचाईमुळे एटीएमच्या रांगेत उभे असलेला सेल्फी ट्वीट केला आहे.
अनिल कपूरच्या पूर्वी दाक्षिणात्या अभिनेता रवी बाबू डूकराच्या पिलासोबत एटीएमच्या रांगेत उभे असताना दिसला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -