मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आगामी चित्रपट 'पानिपत' 6 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि संजय दत्त ऐतिहासिक भूमिकांमध्ये दिसूल आले. अर्जुन कपूर पपेशवे सदाशिवराव यांची भूमिका साकरणार आहे तर संजय दत्त 'अहमद शाह अब्दाली' च्या रूपात दिसणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संजय दत्तचा लूक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. आता या दोन्ही व्यक्तीरेखांचा मेकअप कसा करण्यात आला याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. हा बिहाइन्ड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


संजय दत्त की 'अहमद शाह अब्दाली'?

'पानीपत'मध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने आपल्या बॉडीवर स्पेशल लक्ष दिलं आहे. संजू बाबाने घेतलेली मेहनत ट्रेलर आणि अर्जुन कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बिहाइन्ड द सीन व्हिडीओ शेअर केला आहे.


अर्जुन कपूर असा बनला 'सदाशिव राव'

चित्रपटांमध्ये अर्जुन कपूर सदाशिव राव पेशवा हे पात्र साकारणार आहे. बिहाइन्ड द सीन व्हिडीओमध्ये अर्जुन सांगत आहे की, काही काळासाठी शुटिंग एक महिन्यासाठी बंद होतं. तेव्हा त्याची दाढी आणि केस पुन्हा आले होते. परंतु, शुटिंग सुरू झाल्यानंतर त्याला पुन्हा क्लिन शेव्ह करावं लागलं होतं.

पाहा व्हिडीओ : पाणीपतच्या पाऊलखुणा



दरम्यान, पानिपतकार विश्वास पाटील यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह इतर निर्मात्यांनी आपली कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप करत 'कॉपीराईट' कायद्याअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पानिपतकार विश्वास पाटील यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून यामुळे पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'पानिपत' 6 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार असून यामध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृती सेनन मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील.

संबंधित बातम्या :

'पानिपत'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पानिपतकार विश्वास पाटलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

First Look : 'पानीपत'मध्ये संजय-अर्जुन आमने-सामने; क्रिती साकारणार पार्वतीबाई

Panipat Trailer | जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'पानिपत'चा ट्रेलर प्रदर्शित