Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता या मालिकेत अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह (Tula Shikvin Changlach Dhada Engagement Special Episode) रंगणार आहे.
अक्षरा अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह!
प्रेक्षकांची आवडती मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' यात अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवे आणि रोमांचक वळण येणार आहे. येत्या 4 सप्टेंबरपासून 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अक्षराला अभिनंदन करतात व अगदी आनंदाने शुभेच्छा देतात. अक्षरा गोंधळून जाते. नंतर भुवनेश्वरी शाळेत येऊन अक्षराला 4 तारखेला तिचा आणि अधिपतीचा धुमधडाक्यात साखरपुडा होणार अशी घोषणा करते, अक्षरा हे सगळं बघून थक्क होते. आता या साखरपुडा विशेष सप्ताह भागांमध्ये काय धमाल घडणार. काय असणार भुवनेश्वरीचा नवीन डाव? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागातच पाहायला मिळणार आहे. 4 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेबद्दल जाणून घ्या..
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत आहेत. शिवानी आणि हृषिकेशसह कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखलेही या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची आणि अधिपतीची आहे. जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही तर चरित्र घडवत. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत असं तीच म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं.
दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही त्याची आई त्या दोंघाचं लग्न लावून दिलं आहे.
संबंधित बातम्या