Kadak Singh Review: अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे चित्रपटसृष्टीतील सर्वात शांत व्यक्ती असू शकतात पण त्यांनी कडक सिंहची भूमिका साकारली आहे. त्यांचा कडक सिंह (Kadak Singh) हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटात थोडा वेगळा अंदाज दाखवला आहे. ही अशी गोष्ट आहे जी त्यांनी याआधी कधीही केली नव्हती आणि हे चित्रपट पाहण्याचे हे एक मोठे कारण ठरते.
चित्रपटाचे कथानक
एके श्रीवास्तव म्हणजेच पंकज त्रिपाठी हे आर्थिक गुन्हे विभागातील अधिकारी असतात. जे अपघातानंतर त्यांची स्मरणशक्ती गमावतात. यानंतर, ते कोण आहेत? याबद्दल त्यांना चार वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सत्याचा एके श्रीवास्तव करतात.
अशा परिस्थितीत, कोणती कथा बरोबर आहे, असा प्रश्नही त्यांना पडतो. ते कोण आहेत? त्यांची खरी मुलगी कोण आहे? त्यांचा खरा मुलगा कोण आहे? हे सर्व प्रश्न एके श्रीवास्तव यांना पडतात. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त कथा सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.
हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. या चित्रपटात सुरुवातीपासूनच सस्पेन्स आहे. प्रत्येक क्षणात असे काहीतरी घडते. ज्यामुळे प्रेक्षक खिळवून राहतात. चित्रपटाच्या शेवटी सस्पेन्स उघड होतो.
कलाकारांचा अभिनय
पंकज त्रिपाठी यांनी अप्रतिम काम केले आहे. या चित्रपटात त्यांची अभिनयाची वेगळी शैली दिसते.त्यांनी याआधी अशी कोणतीच व्यक्तिरेखा साकारलेली नव्हती. एके श्रीवास्तव ही खूप कणखर व्यक्तीरेखा आहे ज्याला पंकज त्रिपाठी या पात्राला पूर्ण न्याय देतात.पार्वती तिरुवोथूने नर्सच्या भूमिकेत उत्तम काम केलंय. पंकज त्रिपाठी यांच्या मुलीच्या पात्राला संजना सांघीने ज्ञान दिला आहे. एके श्रीवास्तव यांची मैत्रीण नैनाची भूमिका जया अहसाननं चांगल्या पद्धतीनं साकरली आहे.
दिग्दर्शन
अनिरुद्ध रॉय चौधरीने पिंकसारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी उत्तम केले आहे...सस्पेन्स कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. एकूणच हा चित्रपट चांगला आहे. जर तुम्ही पंकज त्रिपाठीचे चाहते असाल तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका. ZEE5 या अॅपवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या:
The Archies : सुहाना, खुशी आणि अगस्त्य; नेपोकिड्सचा फुगा फुटला!