Freddy Movie Review : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'फ्रेडी' (Freddy) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर कार्तिक सकारात्मक आणि विनोदी भूमिकेत दिसून आला आहे. पण 'फ्रेडी' सिनेमात कार्तिकचा एक नवा अंदाज पाहायला मिळाला आहे.
'फ्रेडी'चं कथानक काय?
'फ्रेडी' नामक एका डेंटिस्टच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकीकडे फ्रेडीला मुलींसोबत बोलण्याची भीती वाटते. दुसरीकडे मुलीदेखील त्याला भाव देत नाहीत. पण अचानक या सिनेमाचं कथानक एका रंजक वळणावर येऊन पोहोचतं.
कार्तिकच्या आयुष्यात एक मुलगी येते. त्याची नजर एका सुंदर मुलीवर पडते आणि पाहताक्षणी तो त्या मुलीच्या प्रेमात पडतो. अशातच ती मुलगी नेमकी कार्तिककडेच दातांवर उपचार करण्यासाठी येते. त्यामुळे कथा थोडी पुढे सरकते आणि अनेक ट्विस्ट सिनेमात येतात. ते ट्विस्ट पाहून प्रेक्षक मात्र हैराण होतात.
मास्टर माईंड फ्रेडी...
'फ्रेडी' या सिनेमातील कार्तिकच्या अभिनयानचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कार्तिकने ही व्यक्तिरेखा परिपूर्णतेने साकारली आहे. या सिनेमासाठी त्याने शंभर टक्के दिले आहेत. सिनेमाच्या माध्यमातून कार्तिकने त्याची 'चॉकलेट बॉय'ची इमेज मोडली आहे. 'मास्टर माईंड फ्रेडी'च्या माध्यमातून कार्तिकने चाहत्यांना थक्क करुन सोडलं आहे.
'फ्रेडी' या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अलाया फर्नीचरवालादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने साकारलेल्या पात्राच्यादेखील वेगवेगळ्या छटा आहेत. 'फ्रेडी' हा अलायाचा आजवरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणता येईल. कार्तिक आणि अलाया दोघांनीही या सिनेमातील आपली भूमिका चोख पार पडली आहे.
शशांक घोषने 'फ्रेडी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एकामागून एक ट्विस्ट आणि रंजक वळणांनी हा सिनेमा प्रेक्षकांना बांधून ठेवतो. प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं सिनेमात घडतं हीच या सिनेमाची खासियत आहे. तसेच हा सिनेमा वेळोवेळी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून सोडतो.
'फ्रेडी' या सिनेमाचं कथानक थोडं वेगळं आहे. पण हा सिनेमा सिनेप्रेमींना नक्कीच आवडेल. प्रेक्षक डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहू शकतात. कार्तिकच्या चाहत्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल.
'फ्रेडी' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. थरार-नाट्य असणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. कार्तिकच्या हटके भूमिकेने चाहत्यांना मात्र वेड लावलं आहे. त्याने साकारलेल्या 'फ्रेडी'चं जग सिनेरसिकांना थक्क करून सोडणारं आहे.
संबंधित बातम्या