Bawaal Review : सिनेमागृहांसोबतच अनेक बिग बजेट सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही (OTT) प्रदर्शित होत आहेत. वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) 'बवाल' (Bawaal) हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. 'दंगल' आणि 'छिछोरे' सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. 


'बवाल' या सिनेमाचं कथानक काय? (Bawaal Movie Story)


'बवाल' (Bawaal) या सिनेमाचं कथानक वरुण धवन म्हणजेच अजय दीक्षित उर्फ अज्जू भैय्याभोवती फिरणारं आहे. लखनौमध्ये राहणारा अज्जू हा शिक्षक आहे. पण त्याला शिकवण्यात काही रस नाही. तर दुसरीकडे जान्हवी कपूर म्हणजेच निशा. निशाला लहानपणापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अडचणींचा सामना करताना ती कधी कोणाच्या प्रेमात पडलेली नाही.


लखनौमध्येच निशा आणि अजयची भेट होते. निशा अजयला पसंत करते. तर जोडीदार म्हणून अजयला जशी मुलगी हवी असते निशा अगदी तशीच असते. पण निशाला एक आजार आहे. याबद्दल लग्नाआधी तिने अजयला सांगितलं होतं. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीचं तिला चक्कर आली आणि दोघांमध्ये दुरावा आला. दरम्यान अजयने एका आमदाराच्या मुलाला कानाखाली मारल्याने त्याला एका महिन्यासाठी शाळेतून निलंबित करण्यात आले. आपल्या प्रतिमेला धक्का बसेल म्हणून अजयने युरोपला जाण्याचा निर्णय घेतला. पण आता यासगळ्यात अजय आणि निशाचं नातं टिकणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.


'बवाल' सिनेमा कसा आहे? 


'बवाल' हा सिनेमा अजय आणि निशा या दोघांभोवती फिरणारा आहे. मुलांवर या सिनेमाचा चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे त्यांना हा सिनेमा नक्की दाखवा. हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणारा आहे. अभिनय आणि सिनेमाचं कथानक यात समतोल राखण्यात नितेश तिवारी यशस्वी झाला आहे. नाट्य, रोमान्स आणि इमोशन्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.


'बवाल' सिनेमातील वरुणच्या अभिनयाचं कौतुक. अज्जू भैय्याची व्यक्तिरेखा त्यांनी चांगली साकारली आहे. जान्हवी कपूरनेही चांगलं काम केलं आहे. नेहमीप्रमाणे नितेश तिवारीचं दिग्दर्शन चांगलं आहे. मिथुन, तनिष्क बागची आणि आकाशदीप सेनगुप्ताने या सिनेमातील गाणी गायली आहे. सिनेमातील गाणी सिनेमाचं कथानक पुढे घेऊन जाणारी आहेत.