Rautu Ka Raaz Review: ज्या प्रमाणे, डोंगरात, अथवा त्या भागात आपला वेग मंदावतो.  सगळं काही आरामात सुरू असते. कोणालाही कसलीही घाई नाही. अगदी त्याच प्रकारे हा चित्रपट आहे. चित्रपट अगदी आरामशीर सुरू असतो. प्रकरण एका हत्येच्या तपासाचे आहे. पण, कोणालाही कसलीही घाई नाही. सगळं आरामात सुरू असते. कथा चांगली आहे, तुम्हाला बांधून ठेवते. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजेश कुमार यांचा चांगला दमदार अभिनय आहे.


> चित्रपटाची  कथा काय?


उत्तराखंडमधील राऊतू नावाच्या ठिकाणी शाळेतील वसतिगृहाच्या वॉर्डनची हत्या होते. शाळेतील लोक म्हणतात की ती झोपेतच मरण पावली. पोलीस चौकशीसाठी येतात, सुरुवातीला पोलिसांनाही वाटते की हा नैसर्गिक मृत्यू आहे. पण नंतर काही रहस्ये समोर येतात आणि हीच चित्रपटाची कथा आहे. आता नेमकं ही रहस्ये काय, कोणत्या घडामोडी घडतात, हे पाहण्यासाठी तुम्हाला झी 5 वर चित्रपट पाहावा लागेल. 


> कसा आहे चित्रपट ?


आपल्याच गतीने हा चित्रपट चालत असतो. या चित्रपटात कोणतेही ढिंच्याक म्युझिक नाही, हिरोगिरी नाही, डायलॉगबाजी नाही. तरीदेखील हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिकण्यास यशस्वी ठरतो. हत्येच्या तपासात हळूहळू रहस्य उघड होत जातात. त्यासोबत नवीन व्यक्तीरेखा समोर येत जातात, त्यामुळे तुमची उत्सुकता आणखी वाढते. खूप धक्कादायक किंवा धक्कादायक असं काही घडत नाही. नेहमीच संथ गतीने सुरू असलेले चित्रपट पाहण्यास फारशी मज्जा येत नाही. पण, हा चित्रपट पाहताना तुम्हाला आनंद वाटेल. काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत. हे चुकीचे आहे, असं कसं होऊ शकतं असा प्रश्न तुम्हाला पडू शकतात. पण, याला क्रिएटीव्ह लिबर्टी म्हणून दुर्लक्ष करू शकता.  


> कलाकारांचा अभिनय


नवाजुद्दीन सिद्दीकी याने एसएचओ दीपक नेगी ही व्यक्तीरेखा साकारली आहे. तो काहीसा विचित्र पण तल्लखही आहे. नवाजने या व्यक्तीरेखेला पूर्ण न्याय दिला आहे. या व्यक्तिरेखेला हिरो बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्यात साधेपणा आहे. त्यामुळे ही व्यक्तीरेखा तुमच्याशी जुळली जाते. नवाजचे काम येथे खूप चांगले आहे. राजेश कुमारने एसआय नरेश प्रभाकर ही भूमिका साकारली आहे. तो आपल्या कॉमिक पंचाने चित्रपट मजेदार बनवतो. या चित्रपटात त्याने नवाजला चांगली साथ दिली आहे. इतर सर्व सहाय्यक कलाकारांनी देखील चांगले काम केले आहे.


> कसं दिग्दर्शन


आनंद सुरापूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पर्वतांची शांतता आणि साधेपणा चांगल्या प्रकारे समजून घेतात. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही उत्तराखंडची सहल कराल. एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असा तयार करता येऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. काही ठिकाणी  कॉमेडी पंच जमले नाहीत. काही ठिकाणी ओढून ताणून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.