LIVE BLOG : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांची टोळी गजाआड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 May 2019 11:45 PM
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहिम स्टेशनवर तांत्रिक बिघाड, डाऊन मार्गावरील सर्व लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहिम स्टेशनवर तांत्रिक बिघाड, डाऊन मार्गावरील सर्व लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने
#BREAKING
अहमदनगर : दरोडेखोरांची टोळी गजाआड,
औरंगाबाद, बीड तसेच अहमदनगर जिल्ह्यात दरोडे टाकणाऱ्या टोळीतील 4 जण अटकेत,
10 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मॉन्सून अंदमानात दाखल, दक्षिण अंदमानातील काही भाग व्यापल्याची माहिती
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मॉन्सून अंदमानात दाखल, दक्षिण अंदमानातील काही भाग व्यापल्याची माहिती
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीच्या निवासस्थानी घेतली भेट
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीच्या निवासस्थानी घेतली भेट
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक संथ गतीने सुरु, शनिवार असल्याने इमॅजिकाला जाणार्या वाहणांमुळे खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी
औरंगाबाद : ट्रॅक्टरखाली चिरडून तीन वर्षीय बालक ठार, भावसिंगपुरा भागातील वीटभट्टीवरील घटना, अंगणात खेळत असताना घडला प्रकार
मुंबई: पावसाळ्याआधी मुंबईतले 20 धोकादायक पूल बंद होणार. हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या ऑडिटमध्ये मुंबईतील 14 पूल धोकादायक असल्याचं निदर्शनास आले, तर त्यातील 8 पूल बंद ठेवून पाडण्यात आले आहेत.
मुंबई : कार्टर रोडवर मेडिकल पीजी प्रवेशातील खुल्या प्रवर्गातील पालक-विद्यार्थ्यांचं आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला सुरवात, फक्त 3 तासाची परवानगी मिळल्याने पुन्हा एकदा आझाद मैदानसाठी अर्ज करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहोचले, थोड्यात वेळात घेणार दर्शन
सांगली : शिराळा तालुक्यातील कोकरूड-शेडगेवाडी रोडवर कॅनॉलसाठी बांधण्यात आलेल्या वारणा जलसेतुवर बिबट्याचा मृत्यू
बीड : उन्हामुळे कीटकनाशकांच्या बाटलीला आग, आगीमुळे धान्याच्या पोत्यांचं मोठं नुकसान, परळी शहरातील धान्य गोदामातील घटना, आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली, आगीत 300 ते 400 पोत्यांचं नुकसान
नागपुरात वंचित बहुजन आघाडीमध्ये निकालापूर्वीच फूट,
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठी या निवडणुकीत काम केल्याचा आरोप करत भारिपचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा कार्यकर्त्यांसह राजीनामा
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, पण प्रश्नांना बगल राहुल गांधींकडून मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली
2. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मनापासून माफ करु शकणार नाही, नथुराम गोडसेवरच्या विधानावर मोदींची नाराजी समोर, अमित शहांकडून वाचाळवीरांना नोटीस
3. लोकसभा अखेरचा टप्प्यातल्या तोफा थंडावल्या, वाराणसी आणि पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला रविवारी मतदान
4. मराठा विद्यार्थ्यांच्या पदवुत्तर मेडिकल प्रवेशासाठी सरकारचा अध्यादेश, मात्र खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी नाराज, सुप्रीम कोर्टात दाद मागणार
5. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टने 561 कोटी रुपये थकवले, टाटा वीज कंपनीची नोटीस, 21 मेपासून वीज विक्री बंद करण्याचा इशारा
6. रविवारी मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा दरम्यान इंटिग्रेटेड ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलणार तर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता