LIVE BLOG | धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jul 2019 10:51 PM
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे :

ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, तीन हात नाका येथील घटना,

गाडीवर काळी फिल्म लावल्याने तिथल्या ट्राफिक पोलिसांनी कारवाई केल्याने मारहाण
शिवसेना नेते आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार
नवी दिल्ली : संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तर नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी मराठी नाटककार राजीव नाईक आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी यांना पुरस्कार जाहीर, तर तबला नवाज झाकीर हुसेन यांना फेलोशिप जाहीर
खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर दानवेंची दिल्लीत घोषणा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार
खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर दानवेंची दिल्लीत घोषणा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित बहुजन आघाडीत जाणार? मुंबईत रावसाहेब शेखावत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला, अमरावतीमधून शेखावत वंचितच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढण्याची चर्चा
मुंबई : डोंगरीमध्ये कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला, इमारतीखाली काही लोक अडकल्याची भीती, अग्निशमन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल
मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाला हायकोर्टाचा लाल झेंडा, यापुढे नव्याने कोस्टल रोडचं काम करण्याची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने परवानग्यांची पूर्तता नाही, सीआरझेड हटवण्याबाबत दिलेली परवानगी हायकोर्टाकडून रद्द
मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाला हायकोर्टाचा लाल झेंडा, यापुढे नव्याने कोस्टल रोडचं काम करण्याची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने परवानग्यांची पूर्तता नाही, सीआरझेड हटवण्याबाबत दिलेली परवानगी हायकोर्टाकडून रद्द
कोल्हापूर : गगनबावडा ते गगनगड घाटरस्त्याचा कठडा तुटला, गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी हजारो भाविकांची वर्दळ, भाविकांसाठी एकेरी वाहतूक सुरु
कोल्हापूर : गगनबावडा ते गगनगड घाटरस्त्याचा कठडा तुटला, गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी हजारो भाविकांची वर्दळ, भाविकांसाठी एकेरी वाहतूक सुरु
मुंबई - दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन


सिद्धिविनायक मंदिर न्यास चिपळणूमधील तिवरे गाव दत्तक घेणार आहे. धरण फुटून ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना सिद्धिविनायक मंदिर न्यास नव्याने घरं बांधून देणार आहे. तसंच गृहपयोगी वस्तूही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय तिवरे गावातील शाळाही मंदिर न्यास बांधणार आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी तिवरे गाव दत्तक घेण्याची मागणी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे केली होती.
बुलडाणा : शहरातील हरवलेली तीन बालकं बंद कारमध्ये सापडली, दोघांचा गुदमरुन मृत्यू, तर एक मुलगी सुदैवाने जिवंत

पार्श्वभूमी

1. विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासनांची खैरात, पाच दिवसांच्या आठवड्यासह निवृत्ती वयाबाबत लवकरच निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

2. चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेलं भाजपचं ओळखपत्र दाखवल्यास टोल फ्री प्रवास, खुद्द भाजप आमदार सुरेश हाळवणकरांकडून पक्षाच्या फुकटेगिरीचा पर्दाफाश

3. अंडी आणि कोंबड्यांना आयुर्वेदिक घोषित करा, नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्याचा किस्सा सांगत संजय राऊतांची राज्यसभेत अजब मागणी

4. एनआयए विधेयकाच्या चर्चेदरम्यान अमित शाह आणि ओवेसींमध्ये जोरदार खडाजंगी, गृहमंत्री विरोधकांना घाबरवत असल्याचा आरोप, तर शाहांचाही ओवेसींवर पलटवार

5. सेवानिवृत्त झालेल्या वयोवृद्ध मंडळींनी शहराबाहेर राहायला काय हरकत, ट्राफिकच्या समस्येवरुन मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा मुंबईकरांना सल्ला

6. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविक दाखल, तर शिर्डीत साईबाबा मंदिरात मोठा उत्साह, चंद्रग्रहणामुळे आज रात्री साईंचं मंदिर बंद राहणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.