LIVE BLOG | एक्झिट पोलशी निगडीत सर्व ट्वीट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश

लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2019 शी निगडीत सर्व ट्वीट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2019 11:06 PM
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2019 शी निगडीत सर्व ट्वीट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश
मराठा आरक्षणावर आधारित प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असल्याने मेडिकल प्रवेश रखडले, विद्यार्थी आणि पालक मुख्यमंत्र्यांच्या दारी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अॅडमिशन प्रक्रिया व्हावी, ती थांबू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेट
आसाम : गुवाहाटीमधील झू रोडवरील शॉपिंग मॉलबाहेर स्फोट, सहा जण जखमी, पोलिसांकडून परिसराला घेराव
मुंबईचे सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पदोन्नती, देवेन भारती यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर बढती, महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदाची जबाबदारी
चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ, प्रति जनावर आता 90 ऐवजी 100 रुपये मिळणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती
पश्चिम बंगालमध्ये प्रचारतोफा एक दिवस आधीच थंडावणार, प्रचारकाळातील हिंसाचारामुळे अभूतपूर्व कारवाई, उद्या रात्री दहा वाजताच लोकसभेचा प्रचार थांबणार
पश्चिम बंगालमध्ये प्रचारतोफा एक दिवस आधीच थंडावणार, प्रचारकाळातील हिंसाचारामुळे अभूतपूर्व कारवाई, उद्या रात्री दहा वाजताच लोकसभेचा प्रचार थांबणार
नागपूर : पोलिस स्टेशनसमोर उभ्या पोलिस वॅनमध्ये बसून टिकटॉक व्हिडीओ तयार करणारा कुख्यात गुंड सय्यद मोबीन अहमदला अखेर अटक, व्हिडीओ शूट करताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणी पोलिसांनी मदत केली का, याबाबात तपास सुरु
वृक्षतोडीची परवानगी नसल्यानं पावसाळ्यात मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मॉन्सून पूर्वतयारी, वृक्षछाटणी, मेट्रो आणि रस्ता रूंदिकरणासह अनेक विकासकामं रखडली. वृक्षतोडीची परवानगी देणा-या पालिकेच्या 'वृक्ष प्राधिकरण समिती'वरील हायकोर्टाची स्थगिती तूर्तास कायम
वृक्षतोडीची परवानगी नसल्यानं पावसाळ्यात मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मॉन्सून पूर्वतयारी, वृक्षछाटणी, मेट्रो आणि रस्ता रूंदिकरणासह अनेक विकासकामं रखडली. वृक्षतोडीची परवानगी देणा-या पालिकेच्या 'वृक्ष प्राधिकरण समिती'वरील हायकोर्टाची स्थगिती तूर्तास कायम
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, प्रवेशाचा घोळ लवकर संपवावा, आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही आमची भूमिका, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं शरद पवारांचं आश्वासन
बारामतीत पराभवाची चिन्हं दिसल्यावर शरद पवार म्हणतात ईव्हीएममध्ये गडबड आहे, अजित पवार म्हणतात गडबड नाही, पवार कुटुंबात काय चाललंय, काहीच कळत नाही, भाजप मंत्री विनोद तावडेंचा टोला
बारामतीत पराभवाची चिन्हं दिसल्यावर शरद पवार म्हणतात ईव्हीएममध्ये गडबड आहे, अजित पवार म्हणतात गडबड नाही, पवार कुटुंबात काय चाललंय, काहीच कळत नाही, भाजप मंत्री विनोद तावडेंचा टोला
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती, निवडणूक आयोगाला अध्यादेश काढण्यासंदर्भात सरकारची विनंती, पूर्वलक्षी प्रभावाने प्रवेश मिळण्यासंदर्भात राज्य सरकारच्या अध्यादेश काढण्याच्या हालचाली, मराठा विध्यार्थ्यांचे आंदोलन राज्यभर पसरण्याआधी कोंडी फोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
कोलकात्यामधील राड्यानंतर तृणमूल कॉंग्रेसची पत्रकार परिषद, अमित शाहांनी बाहेरुन गुंड आणल्याचा तृणमूलचा दावा
वैभववाडीतील अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, 2005 मध्ये 54 कोटींचा खर्च अपेक्षित असलेला प्रकल्प आज 1600 कोटींवर, तीन गावांतील 1800 प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन न करताच कामास सुरुवात केल्याचा याचिकेत दावा
वैभववाडीतील अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, 2005 मध्ये 54 कोटींचा खर्च अपेक्षित असलेला प्रकल्प आज 1600 कोटींवर, तीन गावांतील 1800 प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन न करताच कामास सुरुवात केल्याचा याचिकेत दावा
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत आंदोलन करणाऱ्या विध्यार्थ्यांचे शिष्टमंडळ चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार
आहे.
आज दुपारी 2 वाजता मराठा मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. एक आठवड्याची मुदतवाढ मिळाल्यानंतरही आझाद मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, आज रात्री 8 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत आंदोलन करणाऱ्या विध्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेणार, आज दुपारी 2 वाजता मराठा मोर्चाचे समन्वयक आणि विध्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांची चंद्रकांत पाटलांसोबत बैठक, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करणार
पुणे : एअर फोर्स स्टेशन परिसरातील एअर फोर्स स्कूलच्या प्रांगणात एक हॅण्ड ग्रेनेड सदृश वस्तु आढळल्यानं खळबळ, आज सकाळची घटना, एअर फोर्स आणि पुणे पोलिसांकडून वस्तु निकामी
नवी दिल्ली : मान्सून केरळमध्ये 6 जूनला धडकणार, सर्वसाधारण वेळेपेक्षा यंदा पाच दिवस उशिराने, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
नाशिक : निखिल सोनवणे या नॅशनल रोइंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला, काल रात्री सराव करुन परतत येत असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर चोरट्यांचा हल्ला
, निखिलकडे काहीही न मिळाल्याच्या रागात कोयता आणि चाकूने, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
पुण्याच्या गिरीप्रेमीने रचला इतिहास, कांचनजुंगा मोहीम फत्ते, गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा, उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे
ठाणे : ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार उलटून एकाचा मृत्यू, ठाण्यातील घोडबंदर रोडवर ही घटना घडली, सचिन काकोडकर असं अपघाच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव
पुणे : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जॉगिंग करणाऱ्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडलं, तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू, जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील घटना, ओतूर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू
नागपूर :

प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात आढळलं पालीचे पिल्लू,
ग्राहकाने ऑर्डर केलेल्या सांबरमध्ये पालीचे पिल्लू,

अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल, अजनी चौकातील हल्दीरामच्या आऊटलेटमधील प्रकार

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. कोलकातामध्ये अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा, रोड शो अर्धवट सोडून शाहांना सुरक्षित स्थळी हलवलं, ममतांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचा भाजपचा आरोप

2. ईव्हीएमवरुन पवार कुटुंबातच मतभेद, ईव्हीएमबाबत कुठलीही शंका नाही, अजितदादांचा शरद पवारांना घरचा आहेर, सुप्रिया सुळेंना शंका कायम

3. मोदी सत्तेत आले, तरी सरकार 13 दिवसात पडेल, 'माझा'च्या एक्स्क्लुझिव मुलाखतीत शरद पवारांचं भाकीत, रोहित पवारच्या विधानसभा उमेदवारीचेही संकेत

4. मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार, सरासरीच्या फक्त 93 टक्के पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता, स्कायमेटचा शेवटचा अंदाज

5. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन राजस्थानमध्ये वाद, काँग्रेसकडून अभ्यासक्रम बदलत दहावीच्या पुस्तकात सावरकरांच्या माफीचा उल्लेख, भाजपकडून आक्षेप

6. सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, एकाला अटक, पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी अत्याचार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.