LIVE BLOG | बाळासाहेब थोरातांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 5 कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jul 2019 09:46 PM
बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती
बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना मारहाण
मारहाण करणाऱ्या 6 संशयितांना अटक
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील आश्रम शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू,
संतप्त विद्यार्थिनींचा शिरपूर तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या,
स्थलांतर करण्याची मागणी
मुंबई : महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती, सूत्रांची माहिती, तर
नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, बसवराज पाटील यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक होणार, दोन दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता
नवी मुंबईत तिहेरी हत्याकांडाने खळबळ, एमआयडीसी तुर्भे भागात दोघा भावांसोबत एकाचा मृतदेह आढळला
मुंबई : एफडीएकडून ई-सिगरेट्स, पेन हुक्का, वेपच्या विक्रीवर बंदी, 'एबीपी माझा'च्या स्टिंग ऑपरेशननंतर एफडीएची मोठी कारवाई
शिर्डीतील निमगावमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ, तिघांची कोयत्याचे वार करुन हत्या, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
शिर्डीतील निमगावमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ, तिघांची कोयत्याचे वार करुन हत्या, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
शिर्डी : नाशिक पुणे महामार्गावर संरक्षक जाळीसह दरड कोसळली, संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु

पार्श्वभूमी

1. पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, पुढच्या सुनावणीपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार

2. चीनच्या सैनिकांकडून भारतीय हद्दीत घुसखोरी, विरोधानंतर माघार, तर भारताने लढाऊ विमानं मागे घेतली तरच हवाई मार्ग खुला करणार, पाकचा आडमुठेपणा

3. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते संपर्कात असल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा, कर्नाटक-गोव्यानंतर भाजपने महाराष्ट्र काँग्रेसकडे मोर्चा वळवल्याची चर्चा

4. उघड्या गटारात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोध थांबवला, 48 तासांनंतरही दिव्यांश न सापडल्याने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचा निर्णय

5. औरंगाबादच्या गंगापूरमध्ये आगळ्या-वेगळ्या अळीची चर्चा, झुंडीने चालताना सापाप्रमाणे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, कृषी अधिकारीही अचंबित

6. गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाचा नियम मोडणाऱ्या मंडळांना अनोखी शिक्षा, 39 मंडळांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड, कोर्टाच्या आवारात एक-एक रोपटं लावण्याचेही आदेश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.