LIVE BLOG | राजस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2019 11:18 PM
कोल्हापूर : कोल्हापूरसह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी, ढगांच्या गडगडांसह जोरदार पावसाला सुरुवात, शहरातील सखल भागात पाणी साचलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला मुंबई मनपाच्या डिफॉल्टर यादीत,
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याच्या बिलाची 7 लाख 44 हजार 981 रुपयांची थकबाकी,
मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी
हिंगोली : ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात भाविक व सुरक्षा रक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला
अकोला : जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात, कुरणखेड गावात आठवडी बाजारात शिरले पाणी
राजस्थान बाडमेर येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू



राजस्थान बाडमेर येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू
भाजपने पळवापळवी करुन जे आमचे नेते पळवले हा सरळ सरळ भ्रष्टाचार, घटनेनुसार, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे मंत्री होऊ शकत नाही, ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा पत्रकार परिषदेत घणाघात
माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश
मातोश्री या निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधले
माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश
मातोश्री या निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधले
युती करताना शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती ही प्रमुख अट : उद्धव ठाकरे
पुण्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा गोंधळ, 'मुख्यमंत्री महोदय आता तुम्ही तर आम्हाला वाचवा' अशा आशयाचा पोस्टर दाखवत मुख्यमंत्र्यांशी बोलायची केली मागणी, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले
परभणी मनपाच्या 2 जागा, 88 ग्रामपंचायत सदस्य तसेच मानवत नगराध्यक्षपदासाठी शांततेत मतदान
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात जोरदार पाऊस, हिवरखेड गावात रस्त्यावर साचलं पाणी
सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखाचे लुटमार प्रकरण, आठवड्याभरानंतरही पोलिसांना चोरीचे धागेदोरे सापडले नाहीत, आठवडाभरात सांगली पोलिसांनी तब्बल 1 हजार जणांची केली चौकशी, संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर

मुंबई : राष्ट्रवादीच्या काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणीचे कार्यकर्ते आपसात भिडले, परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव कोणामुळे झाला यावरून वादावादी

बुलडाणा : बोलेरो- कंटेनरचा अपघात, अपघातात चार जण जागीच ठार

बुलडाणा : बुलडाण्याच्या घाटपुरी इथं घरावर निबांचे झाड पडल्याने तिघांचा मृत्यू, हिरडकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतकात एक महिला आणि दोन मुलांचा समावेश

जालना-दोन ठिकाणी वीज पडून 10 शेळ्या आणि एका बैलाचा मृत्यू

उत्तर नगर जिल्ह्यात काही भागात पावसाला सुरूवात, राहुरी ,राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस तर श्रीरामपूर येथे रिमझिम

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात जोरदार पाऊस, हिवरखेड गावात रस्त्यावर साचलं पाणी
पातूर येथे वीज केंद्राजवळ वीज पडून एकाचा मृत्यू, एक जण जखमी, मृतक अभिजीत इंगळे बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील रहिवाशी
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, रोहिणी आणि मृग नक्षत्र खाली गेल्यानंतर आद्र नक्षत्रामध्ये पाऊस
पिंपरी चिंचवडमध्ये स्पेअर पार्टचं डाय बनवणाऱ्या कंपनीत सिलेंडरचा स्फोट , तीन कामगार जखमी

पार्श्वभूमी

1. भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय, अखेरच्या षटकात मोहम्मद शमीची हॅटट्रीक, टीम इंडियाचा विजयी चौकार

2. 'फिर एक बार शिवशाही सरकार'ची घोषणा देत मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार, प्रत्येक मतदासंघात रथयात्रेचं आयोजन, विधानसभेत 220 जागा जिंकण्याचं लक्ष्य

3.लोकसभेच्या निकालानंतर भाजपच मोठा भाऊ, मुख्यमंत्रिपदावर दावा करताना गिरीश महाजनांचं विधान, राज्यातल्या सर्व 288 जागांवर बुथ बांधणीचे प्रभारींचे आदेश

4. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात जामीन, मात्र, खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी,  राजकीय षडयंत्राचा बिचुकलेचा आरोप

5. दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर आर्थिक स्ट्राईक अटळ, काळ्या यादीत टाकण्याचा FATFचा इशारा, इम्रान सरकार मोठ्या अडचणीत

6. सिगारेटप्रमाणेच साखरेच्या पाकिटावरही वैधानिक इशारा छापणार, डायबेटिजच्या विळख्यातून भारताची सुटका करण्यासाठी केंद्राचा निर्णय

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.