✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राज्यभरात पावसाचा कहर

एबीपी माझा वेब टीम   |  31 Jul 2016 01:52 PM (IST)
1

महाराष्ट्राच्या सर्वच भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकण किनारपट्टीसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच विदर्भातही अनेक नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

2

यवतमाळ: यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण रात्री काही भागात पाऊस झाला. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशीच जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातून वाहणारी वाघाडी नदी दुथडी भरून वाहत आहे.

3

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोटसह सोलापूर शहरात रात्रभर पाऊस सुरु आहे. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी झाल्या. अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने गाव तलावाचा बांध फुटला. गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहून गेलं. एका बाजूचा बांध फुटल्याने पावसाने भरलेल्या तलावातील पाणी जातंय वाया.

4

रायगड: रायगड जिल्ह्यातील खोपोली, कर्जत, उरण, मुरुड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पावसाची संततधार सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे.

5

लातूर- लातूरमधील उमरगा दाळींब सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या भागात जवळपास 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उमरगा तालुका 75 मिमी सरासरी पाऊस पडला (व्हीज इन) लातूर जिल्हातील, मांजर, रेणा, जाना, घरणी, तावरजा, मुडगुळ नदीसह सात ही नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

6

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये काल रात्री मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अवघ्या २ तासात चंद्रपूर शहरात १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटरनी उघडण्यात आलेत आहेत. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • राज्यभरात पावसाचा कहर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.