पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामुळं भगवानगडाला छवणीचं स्वरुप
दरम्यान, आज पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी नामदेव शास्त्रींशी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पोलीस बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन उपाधिक्षक, 11 पोलीस निरीक्षक, 21 सहा. निरीक्षक, फौजदार, 325 पोलीस कर्मचारी, 75 महिला पोलीस, दोन आरसीपी प्लाटून, दोन राखीव पोलीस दलाच्या तुकड्या. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून फौजफाटा मागवण्यात आला आहे.
मात्र, त्यांच्या निधनानंतर याठिकाणी कोणत्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही. अशी भूमिका गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली. मात्र पंकजा मुंडे यांनी या निर्णयाला विरोध केल्यानं हा वाद उभा राहिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे दसऱ्या निमित्त भगवानगडावरुन भाषण करायचे.
खबरदारी म्हणून नामदेव शास्त्रींसह 400 हून अधिकजणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ज्यात दसऱ्याच्या दिवशी गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असं आवाहन केलं गेलं आहे.
दसऱ्याच्या निमित्तानं भगवानगडावर होणाऱ्या भाषणाचा वाद कायम आहे. त्यापार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय आहे.