कपिल शर्माच्या मंचावर अण्णांची हजेरी

द कपिल शर्मा शो मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजेरी लावली. 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.
130 मिनिटांच्या 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' सिनेमाचं शूटिंग राळेगणसिद्धी, मुंबई, काश्मीर, लडाख आणि राजस्थानमध्ये झालं आहे.
अण्णा हजारे पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
यावेळी कपिल शर्माने अण्णा हजारेंसोबत सेल्फीही काढला.
द कपिल शर्मा शो मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजेरी लावली. 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.
आता अण्णा आपल्या येणाऱ्या सिनेमाबद्दल काय बोलतात हे पाहण्यासाठी कपिल शर्माचा शो पाहावा लागणार आहे.
या सिनेमात अभिनेत्री तनिषा मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
शशांक उदापुरकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.