बीडमध्ये मुसळधार, बिंदुसरा नदी चार वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्रवारी भल्या पहाटेपासूनच बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत आणि चार वर्षात पहिल्यांदाच बिंदुसरा दुथडी भरुन वाहू लागल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि शहरातील प्रत्येक व्यक्ती पाणी पाहण्यासाठी जमू लागला. 'माझा'ने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हेच अनेकांच्या मनाला सुखावणारं दृष्य टिपलं आहे.
पाहा आणखी फोटो
बीडमधील प्रत्येक व्यक्ती कुटुंबासह नदीच्या किनाऱ्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे बाजारपेठेत पाणी शिरणं हा अनुभव बीडकरांसाठी वेगळाच होता. सखल भागात पाणी साचल्यामुळे त्याचा त्रास झाला पण त्यातही समाधान होतं. कारण चार वर्षांचा भीषण दुष्काळ या पाण्याने धुऊन लावला आहे.
बीडः पावसाळ्यात लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जातात. मात्र हे लोक कसल्या पर्यटनस्थळी नव्हे तर नदीचं पाणी पाहण्यासाठी जमले आहेत. या नदीच्या पाण्यात पाहून प्रत्येकाच्या मनात एक समाधान आहे. त्याला कारणंही तसंच आहे. चार वर्षांनी बिंदुसरा नदी एवढी दुथडी भरुन वाहत आहे. ( गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -