LIVE BLOG : निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Oct 2019 10:13 PM
निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली
, नाशिक पश्चिम या मतदार संघातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचीही तडकाफडकी बदली, नाशिकमधल्या निवडणूक तयारीवर केंद्रीय निवडणूक आयोग नाखूश


, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
जळगावच्या राजमल लखीचंद या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सुवर्ण पतपेढीची दिवाळखोरीकडे वाटचाल, एसबीआयने दोनशे सहा कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या

पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात आता नवा खुलासा समोर, पीएमसी बँकेच्या रेकॉर्डमधून साडेदहा हजार कोटींची रोकड गायब, अंतर्गत चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
वांदे पूर्व विभागातील माजी आमदार आणि शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती, पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी
बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक असून काळजीचं कारण नाही अशी माहिती नानावटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय. तब्येत बिघडल्याने गेल्या दोन दिवसांपासून बिग बी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 16 ऑक्टोबरला पहाटे यकृताच्या आजारामुळे त्यांना नानावटीमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मात्र हे रुटीन चेकअप असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय.

पार्श्वभूमी

 




    1. विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, मोदी-शाह-गडकरींच्या सभा, उद्धव-राज-पवारही मतदारांना साद घालणार



 


, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ




    1. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे अजुनही संपर्कात, शिवसेना नेते अनंत गितेंचा गौप्यस्फोट तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याचा खडसेंचा दावा



 




    1. 2019 मध्ये 2 हजाराची एकही नोट छापली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर, तर पुन्हा देश खड्ड्यात जाणार, राज ठाकरेंचा इशारा



 




    1. काँग्रेस पक्ष सावरकर विरोधी नाही, पण विचारांमध्ये मतभेद, मुंबईत मनमोहन सिंगांचं वक्तव्य, तर ओवेसी आणि कन्हैयाकुमारचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध



 




    1. विधानसभेला कुणाचं पारडं जड, कोणाला मिळणार बहुमत, मूड महाराष्ट्राचा, कौल मराठी मनाचा, संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर



 




    1. बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन  2 दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.