Year Ender 2023 : वर्ष 2023 (Year Ender 2023)आता संपणार आहे आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे. या वर्षी आपण काय नवीन केले ते पाहण्यासाठी हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या संपूर्ण वर्षाकडे मागे वळून पाहतो. हे वर्ष नवीन ट्रेंडच्या दृष्टीने आणि विशेषत: स्किन केअर रूटीनच्या बाबतीत खूपच रोमांचक ठरले आहे. यामध्ये काही ट्रेंड्स आहेत ते जवळपास सर्वांनाच आवडले तर काही ट्रेंड असेही होते जे लोकांना आवडले नाहीत. या वर्षी स्किन केअरच्या बाबतीत कोणते व्हायरल ट्रेंड दिसले ते जाणून घेऊयात.


कोरियन 10 स्टेप स्किन केअर 


यावर्षी, लोकांनी कोरियन लोकांसारखी सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी 10 स्टेप स्किन केअर रूटीन फॉलो केले. हे असं रूटीन आहे जी त्वचेचे हायड्रेशनवर लक्ष केंद्रित करते. यावर लोकांच्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या कारण काही लोकांना ते खूप फायदेशीर वाटले, तर काहींनी सांगितले की यात अशा अनेक स्टेप्स आहेत, ज्यांची त्यांना गरज नाही.


Slugging


या वर्षी स्किन केअर प्रेमींमध्ये स्लगिंग खूप लोकप्रिय झाले. स्लगिंग म्हणजे, यामध्ये लोक आपल्या चेहऱ्यावर पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावून झोपतात. हा कोरियन स्किन केअर ट्रेंड देखील आहे, जो त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहते.  


Microneedling


या वर्षातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडत्या ट्रेंडपैकी एक म्हणजे मायक्रोनेडलिंग. यामध्ये, कोलेजन वाढवण्यासाठी आणि मुरुमांचे डाग, सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी लहान बारीक सुया चेहऱ्यावर टोचल्या जातात. त्यामुळे त्वचा बरी होण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. लोकांना हा ट्रेंड खूप आवडला.


एलईडी थेरपी


या वर्षीच्या स्किन केअर ट्रेंडमध्ये टेक्नॉलॉजीचाही महत्त्वाचा वाटा ठरला. याचं उदाहरण म्हणजे एलईडी थेरपी. यामध्ये चेहऱ्यावर एलईडी लाईटचा प्रकाश पडतो, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. पूर्वी हे फक्त तज्ञांसाठी उपलब्ध असायचे, पण, त्याचा ट्रेंड असा सेट झाला की त्याचे मास्क देखील उपलब्ध होऊ लागले, ज्याच्या मदतीने लोक घरी एलईडी थेरपी करू शकतात.


सिरॅमाइड्स


या वर्षी लोक आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबत फार जागरूक पाहायला मिळाले. म्हणून, सिरॅमाईड्स अनेक लोकांच्या त्वचेच्या काळजीचा एक भाग ठरला. टोनरपासून मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सिरॅमाईड आढळले. खरंतर, सिरॅमाईड त्वचेच्या पेशी कमकुवत होण्यापासून कमी करतात, ज्यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Kids Eyesight : मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे 'ही' कारणे असण्याची शक्यता; चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर