What Is a Strong Password : तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन अकाऊंट नसणारे सध्या फार क्वचितच सापडतील. ऑनलाईन अकाऊंट सुरु करण्यासाठी युझर्सना युझरनेम आणि पासवर्डची आवश्यकता असते. पण युझर्सना अनेक अकाऊंटचे पासवर्ड लक्षात ठेवणं कधी कधी फारच कठीण होतं. या अडचणीवर मात करण्यासाठी बहुतांश युजर विविध अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स सहजरित्या क्रॅक करु शकतात. प्रत्येकवर्षी 'टॉप 200 मोस्ट कॉमन पासवर्ड्स'ची यादी जारी होते. यामध्ये अशा पासवर्डची नावे असतात जी, सायबर गुन्हेगार अथवा हॅकर्स एका मिनिटात हॅक करु शकतात.अशाचे सर्वसाधारण पासवर्डची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. हे पासवर्ड लगेच हॅक होऊ शकतात. सिक्योरिटी सॉल्यूशन्स कंपनी नॉर्डपासने कमकुवत पासवर्डची यादी जाहीर केली आहे. खाली दिलेल्या पासवर्डमध्ये तुमचा पासवर्ड असेल तर लगेच बदला, अन्यथा सायबर गुन्हेगार कधीही तुमचं अकाऊंट हॅक करु शकतात. 


पासवर्डची यादी -  
Aditya, Ashish, Anjali, Archana, Anuradha, Deepak, Dinesh, Ganesh, Gaurav, Gayathri, Hanuman, Hariom, Harsha, Krishna, Khushi, Karthik, Lakshmi, Lovely, Manish, Manisha, Mahesh, Naveen, Nikhil, Priyanka, Prakash, Poonam, Prashant, Prasad, Pankaj, Pradeep, Praveen, Rashmi, Rahul, Rajkumar, Rakesh, Ramesh, Rajesh, Sairam, Sachin, Sanjay, Sandeep, Sweety, Suresh, Santosh, Simran, Sandhya, Sunny, Tinkle, Vishal


सुरक्षित पासवर्ड कसा असतो? (What is a strong password?)
अनेकजण पासवर्ड म्हणून आपलं ना, जन्मतारीख, फोन नंबर अथवा अन्य व्यक्तीगत माहितीचा वापर करतात. सायबर तज्ज्ञांच्या मते, असे पासवर्ड काही क्षणांत हॅक केले जाऊ शकतात. सुरक्षित पासवर्ड कसा असतो? सायबर तज्ज्ञांच्या मते, मजबूत आणि सुरक्षित पासवर्डमध्ये अक्षर, नंबर, स्पेशल कॅरेक्टर आणि इतर आणखी काही गोष्टींचा समावेश असावा. असे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण आहे, पण अकाऊंट, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अवश्यक आहे. 
 
मजबूत पासवर्ड कसा सेट कराल? काय काळजी घ्यावी?
अक्षर, नंबर, स्पेशल कॅरेक्टरला एकत्रिक करुन पासवर्ड तयार करा.  
व्यक्तिगत माहिती पासवर्डमध्ये वापरु नये.  
वारंवार पासवर्ड बदला
एकच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरु नका.  
तुमचा पासवर्ड मोठा असू द्या.  
गुगल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही  Google च्या “टू स्टेप व्हेरिफिकेशन” या फिचरचा वापर करू शकता. 
 लक्षात ठेवा, पासवर्ड हा कॉमन नसावा. पसवर्ड ठेवण्यासाठी क्रिअॅटिव्हपणे विचार करा.
एकाच पासवर्डचा वापर दोन अकाऊंटसाठी करू नये. दोन अकाऊट्सचा पासवर्ड सारखा ठेवल्याने तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. 
तुमच्या आयुष्याशी निगडीत शब्दांचा वापर पासवर्ड ठेवताना करू नका. उदाहरण-
1. जन्म तारीख 
2. नाव
3. फोन नंबर 
4. स्पोर्ट्स टीमचे नाव