World Suicide Prevention Day 2024 : सतत निराशा...पदरी अपयश.. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कलह अशा अनेक कारणांमुळे जगभरातील अनेक लोक आत्महत्या करतात. एका अभ्यासानुसार, जगभरातील जगभरात मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे आत्महत्या हे प्रमुख कारण आहे. दरवर्षी जगभरात 8 लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. अशा मृत्यूंना आळा घालता येत असून देखील लोक आत्महत्येने मरतात हे दुर्दैवी आहे. आज 10 सप्टेंबर म्हणजेच जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. या दिनानिमित्त जाणून घेऊया आत्महत्येच्या विचारांपासून कसं रोखता येईल?
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा उद्देश
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जगात वाढत्या आत्महत्येच्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दिवसाचा उद्देश लोकांना आत्महत्या रोखण्यासाठी आणि स्वत: ला हानी पोहोचवण्याचे विचार टाळण्यास मदत करणे हा आहे. आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया.
आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे?
बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्येसारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे माहित असेल तर ते तुम्हाला ही परिस्थिती टाळण्यास मदत करेल. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कोणाला आत्महत्येचा विचार येत असल्याचे दिसले तर त्यांना अशा प्रकारे मदत केली पाहिजे.
मदतीचा हात पुढे करा
सर्वप्रथम, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमचे विचार सांगा. अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूचे अनेक लोक आपल्याला मदत करू शकतात. त्यांच्याशी चर्चा करा, आवश्यकतेनुसार सल्ला द्या. त्यांना त्यांच्या औषधांबद्दल आठवण करून द्या आणि त्यांना व्यावसायिक मदत घेण्यास प्रोत्साहित करा.
ट्रिगर ओळखा
नैराश्याच्या बाबतीत, अनेक कारणांमुळे आत्महत्येचे विचार पुन्हा पुन्हा येऊ शकतात. एकाकीपणा, मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन यासारख्या परिस्थितीमुळे आत्महत्येचे विचार वाढू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांचा ट्रिगर ओळखा. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहा, त्यांना कुटुंब आणि मित्रांसोबत फोनवर बोलण्यास सांगा आणि उदासीन व्यक्तीला भावनिक स्तरावर बरे वाटण्यासाठी प्रयत्न करा. त्याचप्रमाणे, ड्रग आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी, तसेच स्वतःची काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करा.
आरोग्याची काळजी घ्या
शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तुमचे विचार निरोगी ठेवते. तुमचे आरोग्य चांगले असेल तर हळूहळू आत्महत्येचे विचार कमी होऊ लागतात. त्यामुळे अशा व्यक्तीला सकस आणि संतुलित आहार घेण्यास मदत करा, व्यायाम करा आणि तणाव टाळा. जर तुम्ही दोघे एकाच घरात रहात असाल तर त्या व्यक्तीची झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ निश्चित करा. त्याला चांगली झोप मिळण्यासाठी प्रोत्साहित करा. आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी, व्यक्तीला त्याच्या/तिच्या छंदांसाठी वेळ काढण्यास सांगा आणि शक्य असल्यास, त्याच्या/तिच्यासोबत त्या कार्यामध्ये सहभागी व्हा.
हेही वाचा>>>
Health : तरुणांनो सावधान! तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )