World Diabetes Day 2023 : मधुमेह (Diabetes) हा अतिशय झपाट्याने वाढणारा आणि धोकादायक आजार आहे. हा आजार लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. या आजाराबद्दल लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day 2023) साजरा केला जातो. मधुमेह देखील अनुवांशिक आहे आणि मुख्य म्हणजे, तुमच्या वाईट जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असणे किंवा कमी असणे चांगले नाही. वेळोवेळी आरोग्य तपासणी करून तुम्ही मधुमेहाची स्थिती जाणून घेऊ शकता. साखरेची पातळी अचानक वाढणे किंवा अचानक कमी होणे या दोन्ही परिस्थिती रुग्णासाठी धोकादायक असतात. चला जाणून घेऊयात अशाच काही सवयी, ज्या मधुमेहाचे कारण ठरू शकतात.
7 कारणं ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो
झोप
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणं खूप महत्वाचं आहे, यामुळे तणाव दूर होतो आणि तणाव दूर केल्याने अनेक समस्या कमी होतात. रात्री 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप गरजेचं आहे.
बैठी जीवनशैली
जर तुमची शारीरिक हालचाल फार कमी असेल तर समजून घ्या की तुम्ही अनेक रोगांना आमंत्रण देत आहात. खरंतर, आपण जे काही खातो, जर आपण कोणत्याही प्रकारची क्रिया केली नाही तर ती फॅटच्या रूपात शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे शरीराच्या कार्यावर परिणाम होतो.
ताण
कोणत्याही प्रकारचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो. बीपी वाढल्यामुळे साखरेची पातळीही वर-खाली होत राहते.
मीठ
अन्नात जास्त मीठ घेतल्याने बीपी वाढतो आणि ब्लड प्रेशरचा साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.
साखर
जेवणात जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते, हे आपणा सर्वांना माहित आहे. जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुमची साखरेची पातळी वाढू नये यासाठी शारीरिक व्यायाम करा.
धूम्रपान
धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर तसेच हृदयावर फार घातक परिणाम होतो. धूम्रपानामुळे इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो.
मद्यपान
अल्कोहोलचे सेवन देखील आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे लठ्ठपणाबरोबरच बीपी आणि साखर वाढण्याची शक्यता असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :