Ashadhi Wari 2023 : आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाला (MSRTC) तब्बल 27 कोटी 88 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रेत तब्बल 8 लाख 81 लाख वारकऱ्यांनी लालपरीतून प्रवास केला असून सोलापूर विभागाला 48 लाख 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या आषाढी यात्रेत सुमारे 5 हजार बसेसचे नियोजन महामंडळाने केले होते. आषाढी सुरु झाल्यापासून म्हणजे 25 जून ते 3 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागातून 17 हजार 500 फेऱ्या करुन आणि 47050 किलोमीटर प्रवास करत लालपरीने 8 लाख 81 हजार वारकऱ्यांची वाहतूक केली होती. 


महिला प्रवाशांची संख्या वाढली


महिलांना निम्मी भाडे सवलतींमुळे जवळपास 30 टक्के वारकऱ्यांची संख्या विशेषतः महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महामंडळाने 6 लाख 35 हजार वारकऱ्यांची वाहतूक केली होती. यंदा प्रवासी भारमानात तब्बल 2 लाख 77 हजार 500 प्रवाशांची संख्या वाढली आहे. 


एसटीने कसं केलं होतं नियोजन?


आषाढी यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचे नियोजन करण्यात आलं होतं. यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर इथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं होतं. औरंगाबाद विभागातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200 नाशिक 1000 आणि अमरावती इथून 700 शाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसचं नियोजन केलं होतं. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. 


आषाढी यात्रेनंतर विठुरायाचा थकवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजा


आषाढी यात्रेसाठी गेल्या 18 दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षळ पूजेला आज सकाळी सुरुवात झाली. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी उघडं ठेवण्यात येत असतं. यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करून चोवीस तास दर्शन सुरु असतं. यंदाही राज्यभरातून 12 लाखापेक्षा जास्त भाविकांनी आषाढीला गर्दी केली होती. परंपरेनुसार 19 जून रोजी देवाचा पलंग काढून देव चोवीस तास दर्शनासाठी उभा होता. आज तब्बल 18 दिवसानंतर 7 जुलै रोजी पुन्हा देवाचा पलंग बसवण्यात येणार असून देवाच्या प्रक्षाल पूजेस सकाळपासून सुरुवात झाली. 


हेही वाचा


मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्य वारी संकल्पनेत 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाने दिली आकडेवारी