World Breastfeeding Week 2023 : 'जागतिक स्तनपान सप्ताह' हा दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण 7 दिवस साजरा केला जातो. आठवडाभर चालणारा हा सप्ताह आई आणि मूल दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. बाळासाठी आणि आईसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे याविषयी संपूर्ण जगामध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात, बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले जाते.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार दरवर्षी 27 लाख मुले कुपोषणाला बळी पडतात. मुलांच्या मृत्यूच्या एकूण संख्येपेक्षा ही संख्या खूपच भीतीदायक आहे. आईचे दूध बाळासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते बाळाच्या निरोगी वाढीस मदत करते. अनेकदा डॉक्टरांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत 6 महिने बाळाला फक्त आईचे दूध द्यावे, असे सांगितले जाते. 


'जागतिक स्तनपान सप्ताह' 2023 ची थीम


दरवर्षी जागतिक स्तनपान मोहीम एका खास थीमवर आधारित असते. त्यानुसार, यावर्षीची थीम 'चला स्तनपान करूया आणि काम करूया...काम करूया' अशी आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने नवीन मातांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे देखील सांगितली आहेत



  • जन्माच्या एका तासाच्या आत आपल्या बाळाला स्तनपान करा.

  • बाळाला 6 महिने फक्त आईचेच दूध द्या. पाणीही देऊ नका.

  • 6 महिन्यांपासून बाळाला घरगुती तृणधान्ये खायला दिली जाऊ शकतात. आणि जर तुम्ही 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान करू शकत असाल तर ते नक्कीच करा.


स्तनपानाचे फायदे आणि तोटे



  • जी मुले आपल्या आईचे दूध दीर्घकाळ पितात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत असते. आणि ते सर्व प्रकारच्या रोगांशी सहज लढण्यास सक्षम असतात.

  • ज्या स्त्रिया स्तनपान करतात त्यांना मासिक पाळी येण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत त्यांना पीरियड्समधूनही ब्रेक मिळतो. या काळात ओव्हुलेशन होत नाही असे म्हणतात. 

  • स्तनपानामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  • बाळाच्या जन्मानंतर 6 महिने स्तनपान करणे खूप महत्वाचे आहे.

  • काही महिलांना आईचे दूध पंप केल्यानंतरही बरे वाटत नाही. 

  • काही स्त्रियांना प्रसूतीच्या सुरुवातीच्या आठवड्यात स्तनपान करताना खूप वेदना होतात. 

  • काही महिलांना स्तनामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?