Women Health : महिलांच्या शरीरात वाढत्या वयानुसार अनेक बदल होतात. तसेच विविध हार्मोनल बदलही होतात. महिलांच्या आयुष्यात येणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी, आणि त्यानंतर रजोनिवृत्ती..म्हणजेच मेनोपॉज.. रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे. रजोनिवृत्तीचे तीन टप्पे असतात. पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज. पेरिमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या अगदी आधी येणारा कालावधी. काही जण असा दावा करतात की, मेनोपॉजमुळे महिलांचे वजन वाढते. नेमकं सत्य काय आहे? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, स्त्रीरोग आणि IVF तज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी याबद्दल माहिती दिलीय. जाणून घ्या...



मेनोपॉज दरम्यान, पेरीमेनोपॉज सारखी लक्षणे दिसतात


रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज हा टप्पा सामान्यतः वयाच्या 40 नंतर सुरू होतो, जो 8 ते 10 वर्षे टिकू शकतो. या काळात, स्त्रीला मूड स्विंग, तणाव इत्यादीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यानंतर, रजोनिवृत्ती होते. मेनोपॉज दरम्यान, पेरीमेनोपॉज सारखी लक्षणे दिसतात. जी फार काळ टिकत नाहीत. रजोनिवृत्ती दरम्यान अनेक लक्षणे दिसू शकतात. जसे की अधिक गरमी जाणवणे, केस गळणे, चेहऱ्यावरील केसांची वाढ. हे सर्व इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे होते. 



रजोनिवृत्ती लवकर आल्याने वजन वाढू शकते का? 


याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, वजन वाढण्यासाठी केवळ रजोनिवृत्ती कारणीभूत नाही, तर हे तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींवरून ठरवले जाते. लवकर रजोनिवृत्तीसाठीही असेच म्हणता येईल. तसे, लवकर रजोनिवृत्तीमुळे, महिलेचा वारंवार मूड बदलतो. अनेक वेळा स्त्रिया तणाव किंवा मूड स्विंगला सामोरे जाण्यासाठी जास्त खातात. हे देखील जास्त वजन असण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.



(पेरिमेनोपॉज) लवकर रजोनिवृत्तीची लक्षणे


लवकर रजोनिवृत्तीमुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात, जसे की-


अचानक गरमी होणे
रात्री घाम येणे
योनीमार्गात कोरडेपणा
झोपेचा त्रास
कमी मूड किंवा चिंता
लैंगिक संभोगाची इच्छा नसणे
स्मृती समस्या


 


लवकर रजोनिवृत्तीची कारणं काय?


कुटुंबात किंवा आईला लवकर रजोनिवृत्तीचा इतिहास असल्यास, तुम्हालाही लवकर रजोनिवृत्तीचा धोका असतो. याची इतरही कारणे आहेत, जसे की कमी वजन असणे, वयाच्या 8 वर्षापूर्वी मासिक पाळी सुरू होणे, धूम्रपान करणे किंवा मुलाला जन्म न देणे.


 


हेही वाचा>>>


World IVF Day 2024 : IVF मुळे नेहमी जुळी मुलंच होतात का? नेमकं सत्य काय? तज्ज्ञांकडून योग्य उत्तर जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )