Women Health: रोज रोज तुझी कसरत तारेवरची... जरा थांब...श्वास घे... दिवस उजाडल्यापासून ते रात्रीपर्यंत महिला कुटुंबाच्या काळजीत गुंतलेल्या असतात. मुलांचं संगोपन, कौटुंबिक जबाबदारी तसेच आजकालच्या महिला करिअर घडविणाऱ्या असल्याने ऑफिसचा ताण यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसं दिवसभर काम केल्यानंतर, प्रत्येक व्यक्तीला रात्री शांत झोप हवी असते. आपण अनेकदा म्हणतो की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना नीट झोप येत नाही आणि त्यांची झोप पूर्ण होत नाही. पण एका अभ्यासानुसार तुम्हाला हे नाकारवे लागेल. कारण संशोधनानुसार महिलांना नीट झोप का येत नाही, यामागे अनेक कारणे आहेत, जी संशोधनात समोर आली आहेत. जाणून घ्या 


महिलांवर संशोधन, जेव्हा निकाल समोर आला तेव्हा...


हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि साउथॅम्प्टनमधील महिला संशोधकांच्या मते, महिलांचे अंतर्गत शरीर घड्याळ पुरुषांपेक्षा 6 मिनिटे जास्त असते. महिलांना पुरेशी झोप न मिळण्यामागे हे देखील एक कारण आहे. माहितीनुसार, काही महिलांवर हे संशोधन करण्यात आले, त्यांना स्मार्टवॉचसारखे उपकरण घालण्यात आले, जेणेकरून त्यांच्या हृदयाचे ठोके आणि झोपेचे स्वरूप समजू शकेल. जेव्हा निकाल समोर आला तेव्हा असे दिसून आले की त्यांची झोपेची पद्धत पुरुषांपेक्षा खूपच वाईट होती. महिलांच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल मासिक पाळीच्या चक्रामुळे झाला असल्याचे समोर आले. अनेकदा महिलांची मासिक पाळी दर महिन्याला सारखी नसते. दर महिन्याला तारीख बदलत राहते. त्याचा झोपेवर परिणाम होतो. त्याचबरोबर मासिक पाळी सुरू असतानाही महिलांना पुरेशी झोप मिळत नाही. एका सर्वेक्षणानुसार, 53 टक्के महिलांना भीती वाटते की, त्यांना रात्री मासिक पाळी येऊ शकते आणि त्यामुळे त्यांना नीट झोप येत नाही.


रेस्टलेस लेग सिंड्रोम देखील कारणीभूत


पुरुषांच्या तुलनेत महिलांना रेस्टलेस लेग सिंड्रोमचा म्हणजेच पायांच्या दुखण्याच्या त्रास होण्याची शक्यता 25 ते 50 टक्के जास्त असते. या सिंड्रोमने पीडित महिला त्यांचे पाय दिवसभर सक्रिय असतात, ज्यामुळे ते दुखतात. रात्रीच्या वेळी ही स्थिती आणखी वाईट होते. या समस्येने त्रस्त महिलांना रात्री चांगली झोप घेण्यास त्रास होतो.


झोपण्याची आणि उठण्याची वेळ


पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सर्केडियन लय विस्कळीत होते. झोपेचा विकार, मूड डिसऑर्डर आणि इतर कारणांमुळे हा त्रास अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांमुळे होतो. प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची आणि उठण्याची वेळ असते. मेंदूतील हायपोथालेमस ग्रंथी सर्कॅडियन लय चालू करते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित होते.


निद्रानाश किंवा झोप न लागण्याची ही कारणं


तणाव किंवा नैराश्य
गोंगाट 
खोली खूप गरम किंवा थंड असणे
बेड आरामदायक नाही
मद्यपान, चहा-कॉफी किंवा धूम्रपान
कार्यालयीन कामाच्या वेळा निश्चित न करणे इ.


अशी चांगली झोप घ्या



  • जर तुम्हाला रात्री शांत झोप घ्यायची असेल तर रोज ध्यान करायला सुरुवात करा.

  • तुम्ही शांत ठिकाणी बसून ध्यान करू शकता.

  • ध्यान केल्याने मन शांत होते. तणाव कमी होतो.

  • लॅव्हेंडर तेलाचे दोन ते तीन थेंब रुमालावर फवारून वापरा.

  • किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काही थेंब टाकून देखील वापरू शकता. त्यामुळे रात्री चांगली झोप येईल.

  • झोपेची स्वच्छता राखा. कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा.

  • रात्री झोपण्यापूर्वी धूम्रपान करू नका.

  • रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहू नका. फोनपासूनही दूर राहा.


हेही वाचा>>>


Weight Loss: काय सांगता! तरुणीने घरच्या घरीच तब्बल 53 किलो वजन कमी केले! कसं केलं शक्य? प्रेरणादायी प्रवास


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )