Women's Health Tips : मध्यम वय म्हणजे 40-60 पर्यंतचे वय एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या वयात, बहुतेक महिलांचे जीवन व्यस्त राहते. कुटुंब, करिअर, सामाजिक जीवन आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही. 


मध्यम वय हा एक काळ असतो जेव्हा शरीरात काही समस्या निर्माण होतात. सांधेदुखी, पोट खराब होणे, वजन वाढणे आणि अशा अनेक समस्या आहेत, ज्या वयाच्या या टप्प्यावर येताच सुरू होतात. अशा वेळी महिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवीन पिढीच्या महिलांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वयाच्या चाळीशीत महिला नेमक्या कोणत्या चुका करतात ते जाणून घ्या.


1. हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष : शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. या हृदयाची काळजी घेणे, नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषत: चाळीशीनंतर खूप काळजी घ्यावी लागते. हृदयाच्या आरोग्याच्या संकेतांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्टेरॉल यांचा समाविष्ट आहे. या सर्व बदलांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आरोग्याशी खेळणे होय.


2. केसांकडे दुर्लक्ष : महिलांच्या केसांची लांबी ही वयानुसार ठरवली जात नाही. पण वयानुसार केसांचा दर्जा नक्कीच खराब होऊ लागतो. त्यामुळे या वयात केसांची चांगली काळजी घ्यायला हवी. आता तुम्ही 40 पेक्षा जास्त आहात असा विचार करून केसांशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. तर केसांची योग्य काळजी निगा राखा. 


3. आरोग्याकडे दुर्लक्ष : कुटुंब आणि मुलांची काळजी घेताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ही इतकी मोठी चूक आहे, ज्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने चाळीशीनंतर स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी एक तास ध्यानधारणा, प्रवास किंवा तुम्हाला विश्रांती देणारी कोणतीही गोष्ट केली पाहिजे. हे स्वतःला रिचार्ज करण्यास मदत करते.


4. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष : जसजसे महिलांचे वय वाढत जाते तसतसे पोटात तयार होणार्‍या ऍसिडचे प्रमाण कमी होते. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता ही 40-60 वयोगटातील बहुतेक महिलांसाठी चिंतेची बाब आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 देखील आवश्यक आहे. मध्यम वयात, प्रत्येक स्त्रीने आपल्या आहारात अंडी, मांस, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी जीवनसत्त्वे असलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha