Women Health : जन्म बाईचा..खूप घाईचा..एक आईचा..एक ताईचा.. चित्रपटातील हे गाणं आपल्या सर्वांना माहित असेल. आजकालच्या जगात महिला त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. त्या देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र या धावपळीत कधी कामाचा ताण तर कधी चांगला जोडीदार न मिळाल्याचा ताण आहेच.. आणि  ही सर्व कारणं गरोदरपणाला उशीर होण्यासाठी पुरेशी आहे. अशात, आपल्या सोयीनुसार मुलाच्या जन्माचा निर्णय घेण्यासाठी 'एग फ्रीझिंग' म्हणजेच अंडी गोठवणे ही सर्वोत्तम प्रक्रिया आहे. 'एग फ्रीझिंग' म्हणजेच स्त्रियांची अंडी गोठवण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. एग फ्रीझिंग हे एक तंत्र आहे जे तुम्हाला वाढत्या वयातही आई बनण्याची सुविधा देते. या प्रक्रियेद्वारे प्रजनन क्षमता जपली जाऊ शकते. काही कारणास्तव गरोदरपणाला उशीर झाल्यास महिलांना आपल्या सोयीनुसार मुलाच्या जन्माचा निर्णय घेण्यासाठी 'एग फ्रीझिंग' ही सर्वोत्तम प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत अंडाशयातून अंडी काढून गोठवली जातात.



'एग फ्रीझिंग' प्रक्रिया काय आहे?


अंडी फ्रीझिंगला oocyte cryopreservation असेही म्हणतात. या प्रक्रियेअंतर्गत अंडाशयातून अंडी काढली जातात. ज्या स्त्रियांना गर्भधारणा उशीरा करायची असते. अशा महिलांची अंडी गोठवली जातात. अंडाशयांना चालना देण्यासाठी हार्मोन इंजेक्शनची मदत घेतली जाते. त्याच्या मदतीने अंडाशय अनेक अंडी सोडण्यासाठी उत्तेजित होतात. या प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. परंतु या प्रश्नांपैकी, सर्वात खास आणि सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अंडी गोठवल्याने कौमार्यत्वावर परिणाम होतो की नाही? अशाच काहीप्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.



अंडी गोठवल्याने कौमार्य हानी होते का?


भविष्यातील आई होण्यासाठी, एग फ्रीझिंगची मदत घेतली जाते. अंडी गोठवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध येत नाही. पण हायमेन फुटण्याच्या वेळी कौमार्य नष्ट होणे स्वाभाविक आहे. अंडी पुनर्प्राप्ती दरम्यान कौमार्य राखणे सोपे नाही.



कोणत्या वयात अंडी गोठवणे योग्य आहे?


अंडी गोठवण्याचे योग्य वय 20 ते 30 वर्षे आहे. त्या वयात, प्रजनन दर आणि अंडी संख्या दोन्ही स्त्रियांमध्ये जास्त आढळते, ज्यामुळे अंडी पुनर्प्राप्त करणे सोपे होते. रि-प्रॉडक्टिव्ह वयात अंडी गोठवल्याने अंड्यांचा सुपीकताही कायम राहते.



ही एक वेदनादायक प्रक्रिया?


एग फ्रीझिंग म्हणजेच अंडी गोठवण्याची प्रक्रिया काही विशेष औषधाच्या साहाय्याने केली जाते. अंडी पुनर्प्राप्ती प्रक्रियेदरम्यान अनुभवलेल्या वेदना प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात. कोणत्याही प्रकारचे दुखणे औषधोपचाराने नियंत्रित केले जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.


 


अंडी किती काळ साठवता येतात?


अंडी पुनर्प्राप्त केल्यानंतर किती काळ साठवता येतात? हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्यासाठी अंड्याच्या दर्जापासून ते साठवणूक तंत्रज्ञानापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल, विट्रिफिकेशनचा वापर अंडी गोठवण्यासाठी केला जातो.



ही प्रक्रिया लैंगिक अनुभवावर अवलंबून?


अंडी गोठवण्याचा तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहात की नाही याचा काहीही संबंध नाही. वास्तविक, स्त्रीच्या लैंगिक अनुभवावर अवलंबून अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होत नाही. खरं तर, या प्रक्रियेपूर्वी, स्त्रीने लैंगिक संबंध ठेवले आहेत की नाही हे डॉक्टरांना माहित असणे आवश्यक नाही. ,


 


किती अंडी गोठवली पाहिजेत?


एग फ्रीझिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अंड्यांची संख्या देखील जास्त असणे आवश्यक आहे. एका वेळी 10 ते 15 अंडी गोठविल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. याशिवाय लहान वयात अंडी गोठवल्यानेही गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Women Health : बाळा गाऊ कशी अंगाई.. 'वर्किंग मॉम्स' चं मुलांकडे दुर्लक्ष होतंय? ऑफिस, घर, मुलं यांच्यात कसा राखाल समतोल?