मुंबई : व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे कोणालाच सहासहजी समजत नाही. परंतु, समोरची व्यक्ती काय विचार करत आहे किंवा त्यांच्या मनात काय चालले आहे हे स्त्रियंना (Women ) लगेच समजते. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात (Eyes) पाहून स्त्रीया याबाबत जाणून घेऊ शकतात. पुरुषांना (Men) देखील डोळे पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे समजतं. परंतु, स्कोअरिंगच्या बाबतीत महिला पुरूषांच्या पुढे आहेत. म्हणजेच पुरूषांपेक्षा महिला माणसं ओळखण्यात सरस असतात. एका अभ्यासानुसार ही माहिती समोर आली आहे.  


“Reading the Mind in the Eyes” या अभ्यासातून   पुरूषांपेक्षा महिला माणसं ओळखण्यात सरस असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासात भारतासह 57 देशांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासानंतर संशोधकांना असे आढळले की, सर्व वयोगटातील आणि बहुतेक देशांतील महिलांनी या चाचणीत पुरुषांपेक्षा सरासरी जास्त गुण मिळवले.  


असे संशोधन केले 


केंब्रिज विद्यापीठाच्या मानसोपचार विभागातील अभ्यासाचे प्रमुख लेखक डेव्हिड ग्रीनबर्ग यांनी याबाबत माहिती दिली. स्वत:ला इतरांच्या ठिकाणी ठेवून विचार केल्यानंतर याबाबत समजते. म्हणजेच समोरची व्यक्ती काय विचार करत आहे किंवा त्यावेळि तिला काय वाटत आहे. मागील अभ्यासांमध्ये, संज्ञानात्मक सहानुभूती मोजण्यासाठी डिझाइन केलेल्या चाचण्यांमध्ये स्त्रियांनी पुरुषांपेक्षा जास्त गुण मिळवून हे दर्शविले की, माणसे ओळखण्यात पुरूषांपेक्षा स्त्रीया जास्त सरस आहेत, असे ग्रीनर्ग यांनी सांगितले. 


हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास आहे. इस्रायल, इटली, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका या संशोधनात सामील झाले. अभ्यासात 305,700 हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यातून असे आढळून आले की 36 देशांतील पुरुषांपेक्षा स्त्रियांनी सरासरी लक्षणीयरीत्या जास्त गुण मिळवले. 


16 ते 70 वयोगटातील लोकांचा समावेश  


ग्रीनबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये 36 डोळ्यांची चित्रे पाहणे आणि प्रत्येक चित्रातील चार विशिष्ट भावना सांगणे, अशी ही चाचणी होती. यात अहंकारी, कृतज्ञ, दिव्यांग, अनिश्चित, उत्साही, भयभीत आणि कंटाळवाण्या लोकांच्या डोळ्यांची चाचणी करण्यात आली.  या चाचणीत कोणत्याच देशातील पुरुषांनी स्त्रियांपेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत. यात असे दिसून आले की, 16 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील स्त्रिया संज्ञानात्मक सहानुभूतीमध्ये पुढे आहेत.


महत्वाच्या बातम्या


Retirement Planning : रिटायरमेंटनंतरच्या सुखी आयुष्यासाठी 24 टक्के भारतीय करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर